Share

कशी वाटली जुनी शिवसेना? काल शिवसेना भवनासमोर तर आज सोशल मिडीयावर भिडले सेना-भाजपचे कार्यकर्ते

Published On: 

मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या ट्रस्टने जमीन घोटाळा केल्याच्या आरोपामुळे देशभरात खळबळ उडाली होती. याच मुद्यावरून सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला होता. त्यामुळे भाजप युवा मोर्चाच्या वतीने शिवसेना भवनावर ‘फटकार’ मोर्चा काढला होता. यावेळी शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच धुमश्चक्री उडाली.

भाजपने शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढून निषेध करणार होते. भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चेकरी जमा झाल्यानंतर शिवसैनिकांनी शिवसेना भवनाच्या परिसरात गर्दी केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरवातीला बाचाबाची झाली नंतर याच रुपांतर हाणामारीत झाले.

या सर्व प्रकारानंतर आता सोशल मिडीयावर देखील भाजप आणि शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते भिडले आहेत. अनेक प्रकारचे मिम्स,व्हिडीओ बनवत एकमेकांना डिवचत आहेत. महापौर किशोरी पेडणेकर यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी लढण्याचे धडे दिले आहेत. तसेच, त्याचा ‘फटकन आवाज आला तर आपला काडकन आवाज आला पाहिजे. तर तो शिवसैनिक आहे’, असं हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.

https://www.facebook.com/pokalemahesh/posts/4064718210313222

https://twitter.com/VinodMishra4U/status/1405412129897795587?s=20

दरम्यान, महापौरांच्या या ट्वीटच्या खाली काही कमेंट्स आहेत ज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची कॉंग्रेस होऊ देणार नाही असे म्हणत असल्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तर काहींनी महापौराना टीका टिपण्णी सोडून काम करण्याचा देखील सल्ला दिला आहे.

दुसऱ्या बाजूला भाजप आमदार नितेश राणे म्हणाले की, सेनाभवनासमोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना जाऊन सांगा की, तुमचा उद्धव आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे. मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात. भाजपाच्या मुंबईतील कार्यकर्त्यांना मानले, अशा शब्दात नितेश राणे यांनी सेनाभवनसमोर शिवसैनिकांशी भिडणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांचेही नितेश राणे यांनी कौतुक केले आहे.

दरम्यान, नितेश राणे यांना देखील काहींनी ट्रोल केले असून शिवसेनेचा दरारा कायम असल्याचे दाखवून दिल्याचा दावा देखील केला आहे. तर काहींनी भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांचे अभिनंदन केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!