🕒 1 min read
बीड : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आपण नाराज नसल्याचे सांगितले आहे. तरीही त्यांचे समर्थक मात्र पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावरून संताप व्यक्त करत राजीनामे देत आहेत.
बीड भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांच्याकडे आत्तापर्यंत 80 राजीनामे सुपूर्द करण्यात आले आहेत. केज पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती यांच्यासह 4 सदस्यांनी जिल्हाध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला आहे. याआधी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनीदेखील राजीनामा सुपूर्द केला आहे.
बीड जिल्ह्यात भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे आणखीन राजीनामे येण्याची शक्यता आहे, अशा आशयाचे राजेंद्र मस्के यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लिहिलं आहे. त्यानंतर ते ७७ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन मुंबईकडे रवाना झालेत. उद्या मंगळवारी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन यावर चर्चा करणार आहेत.
पंकजा मुंडे समर्थकांची समजूत काढणार
पंकजा सध्या दिल्लीत आहेत. काल रविवारी त्यांनी राष्ट्रीय सचिवांच्या बैठकीला उपस्थिती लावली. त्यानंतर पक्षाध्यक्ष जेपी नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही त्यांनी भेट घेतली. यावेळी सर्व राष्ट्रीय सचिव आणि नड्डाही उपस्थित होते. राजीनामा सत्र आणि मोदींच्या भेटीनंतर पंकजा यांनी मंगळवारी मुंबईत समर्थकांची बैठक आयोजित केली आहे. यावेळी त्या कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांना राजीनामे मागे घेण्याच्या सूचना करतील अशी अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नितेश राणेंनी एकत्र येण्याचे वक्तव्य केल्यानंतर शिवसेनेने दिली प्रतिक्रिया
- वेब सिरीजनंतर क्रीडाविश्वात ‘समांतर’ची पुनरावृत्ती! सचिन-मेसीची सारखीच कहाणी
- ‘शाळा अद्याप सुरू करू नयेत, कारण…’ ; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची भूमिका
- महाराष्ट्रात आज कोरोनाचे ८ हजार ५३५ नवे रुग्ण तर ‘इतके’ रुग्ण कोरोनामुक्त
- ‘नागरिकांनी ‘या’ अफवांवर विश्वास ठेवू नये’, मंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

