🕒 1 min read
उस्मानाबाद : १६ मार्च रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असतांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा ॲड. मंजूषा मगर (Manjusha Magar) व तालुकाध्यक्षा सुरेखा जाधव (Surekha Jadhav) यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसमध्ये निष्ठावंतांची कुचंबणा होत असून, अपमानास्पद पद्धतीने पदाधिकाऱ्यांना पदावरून काढले जात आहे. त्यामुळे आम्ही पदांचा सामूहिक राजीनामा देणार असल्याची माहिती दिली आहे.
यावेळी बोलत असतांना मंजूषा मगर म्हणाल्या की,‘राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आम्ही सर्व महिला राष्ट्रवादी काँग्रेससोबत निष्ठेने उभा राहिल्या आहोत, असे असताना राज्यपातळीवरून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या जागी इतर महिलांची नियुक्ती केली जात आहे.’, असे मगर म्हणाल्या. तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या २० पदाधिकारी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे देणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, यावेळी उस्मानाबाद शहराध्यक्षा वंदना डोके, कळंब तालुकाध्यक्षा मनीषा साळुंके, प्रीती गायकवाड,अफसाना पठाण, ज्योती माळाळे, ऋतुजा भिसे, स्वाती भातलवंडे, बालाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! नवाब मलिकांची सर्व खाती काढून घेतली, राष्ट्रवादीचा निर्णय
- IPL 2022: ‘आता तो पहिल्यासारखा आक्रमक राहिला नाहीये’; विराटबाबत आरसीबीच्या खेळाडूचे मोठे वक्तव्य
- आमिर खान अनुष्का शर्माची जोडी पुन्हा दिसणार एकत्र? जाणून घ्या…
- पंजाबमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी भगवंत मान यांचा मोठा निर्णय!
- “फडणवीसांकडे अक्कल आहे परंतु प्रामाणिकपणा नाही”- हर्षवर्धन जाधव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
