Share

ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना व दूध उत्पादकांना वाऱ्यावर सोडले,समरजितसिंह घाटगे यांचा घणाघात

Published On: 

कागल/प्रतिनिधी – गाईच्या दुधाला सरसकट दहा रुपये लिटर अनुदान व दूध पावडरला प्रति किलो 50 रुपये अनुदान द्यावे, या मागणी करिता येत्या एक ऑगस्ट रोजी भाजपा, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम, रिपाई आठवले गट या मित्रपक्षामार्फत मार्फत राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येणार आहे. अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष व शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी दिली. या आशयाचे निवेदन त्यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलतराव देसाई तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संकटामध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. बँकेकडून नाकारले जाणारे कर्ज, नकली सोयाबीन बियाणे, दुबार पेरणी, युरिया खताचा तुटवडा व त्यामधील काळाबाजार, कोकणातील शेतकऱ्यांचे वादळामुळे झालेले नुकसान, अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांसमोर संकटांची मालिकाच उभी आहे. या शेतकऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही दिलासा शासनाकडून देण्यात आलेला नाही.

यातच भर म्हणून गाईच्या दुधाचे खरेदीचे भाव कमी झाल्याने गाय दूध उत्पादक शेतकरी यांची दयनीय अवस्था झाली आहे. महाराष्ट्रामध्ये 1 कोटी 40 लाख लिटर गाईचे दूध उत्पादित होते. त्यापैकी 35 लाख लिटर सहकारी दूध संघाकडून खरेदी केले जाते. 90 लाख लिटर दूध खाजगी संस्था व डेअरीच्या माध्यमातून विकत घेतले जाते. 15 लाख लिटर दूध शेतकरी स्वतः हॉटेल, ग्राहक यांनादेतो. शासकीय योजनेद्वारे फक्त एक लाख लिटर दूध खरेदी केले जाते. कोरोनाच्या व लॉक डाऊनच्या काळात दूध विक्री मध्ये 30 टक्केपर्यंत घट झाली आहे.

शहरांमधील हॉटेल्स ,चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली आहे. आजच्या घडीला खाजगी संस्था व सहकारी दूध संघाकडून दूध 15 ते 16 रुपये लिटर दराने खरेदी केले जात आहे. त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्च सुद्धा निघू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे.शासनाने दहा लाख लिटर दूध 25 रुपये प्रति लिटर या भावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात सात लाख लिटर दूध खरेदी केले जात आहे. मंत्र्यांचे लागेबांधे असलेल्या दूध संघांकडून शासन दूध विकत घेत आहे. इतर शेतकऱ्यांना व दूध उत्पादकांना शासनाने वाऱ्यावर सोडले आहे.

गाईच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये अनुदान ,व मुक्ती पावडर करीता पन्नास रुपये प्रतिकिलो अनुदान द्यावे तसेच शासनाने रु 30 /- प्रति लिटर या दराने दुधाची खरेदी करावे या मागण्या करीता सर्व शेतकऱ्यांच्या वतीने एक ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दूध आंदोलन छेडण्यात येणार आहे. यावेळी आरपीआय चे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे, शेतकरी युवा मोर्चाचे भगवानराव काटे यांच्यासह मित्रपक्षाचे पदाधीकरी व कार्यकतें सहभागी होणार आहेत यावेळी गाईचे पवित्र दूध मुख्यमंत्री व सर्व सहकाऱ्यांना पाठवण्यात असून त्याचे प्राशन करून न्याय बुद्धीने वरील सर्व मागण्या मान्य कराव्यात अशी अपेक्षा ही निवेदनात केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘मला ३५ कोटी रुपयांची ऑफर दिली होती,मात्र तरीही मी कॉंग्रेस सोडली नाही’

…तर विरोधकांनी काहीही न खाता-पिता मोदी सरकार एव्हाना पाडलं असतं – सुधीर मुनगंटीवार

गणेशोत्सव: चाकरमान्यांसाठी दिलासा, एसटीने कोकणात जाण्यास सशर्त परवानगी

कोरोनाच्या अपयशावरुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भूमिपूजनाचा घाट – थोरात

दूध दरासंदर्भात मंत्रालयात उद्या बैठक;बळीराजाला मायबाप सरकारकडून मोठी आशा

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!