मुंबई: चाकरमानी आणि गणेशोत्सव हे एक समीकरण आहे. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी गणेशोत्सवाला जाऊ शकणार नाहीत असे चित्र निर्माण झाले होते. तर, विरोधकांनी चाकरमान्यांच्या गणेशोत्सवात कोकणात जाण्यासंदर्भात सोयी पुरावण्यावरून सरकारला चांगलेच घेरले होते. क्वारंटाईनच्या नियमांसाहित प्रवासासाठी सरकारने पर्याय उपलब्ध करून द्यावेत अशी सर्व चाकरमान्यांची मागणी होती.
दरम्यान, आता गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना ठाकरे सरकारने खुशखबर दिली असून नियमांचे पालन करुन भक्तांना एसटीने गणेशोत्सवात कोकणात जाता येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. कोकणात गणेशोत्सवानिमित्त गावी जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना अटी आणि शर्तीसह एसटीने प्रवास करणे शक्य असल्याचे अनिल परब यांनी सांगितले.
दूध दराच्या प्रश्नावर शिवसंग्राम आक्रमक,मेटे यांनी सरकारला दिला निर्वाणीचा इशारा
“एसटीची सेवा तर उपलब्ध होईलच. त्यामुळे लोकांना एसटी उपलब्ध करून द्याव्या लागतील. पण अटी शर्थींची पूर्तता करुन हे सर्व करावं लागेल. कोकणात गणेशोत्सव काळात गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार”, असेही ते म्हणाले. या संदर्भात टीव्ही ९ ने वृत्त दिले आहे.
…तर विरोधकांनी काहीही न खाता-पिता मोदी सरकार एव्हाना पाडलं असतं – सुधीर मुनगंटीवार
“मुंबई आणि एमएमआर क्षेत्र, पुणे या भागातून येणाऱ्या चाकरमान्यांना कोकणात जाता यावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणारी यंत्रणा सक्षम केली जात आहे. आयसीएमआर, आरोग्य विभागाकडून आम्ही गाईडलाईन्स मागवल्या आहेत. राज्य सरकार त्याविषयी अधिक माहिती घेत आहे” असे अनिल परब यांनी सांगितले.
‘या’ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूच्या वडिलांना झाला कोरोना
दरम्यान, गणेशोत्सवात मुंबई भागातून काही लाख नागरिक विशेषत: रत्नागिरी, सिंधुदुर्गात आपापल्या परंपरागत घरी जाऊन उत्सव साजरा करतात.सध्या कोरोनाचा संसर्ग शहरी भागात जास्त दिसत असला तरी ग्रामीण भागातही तो दिसू लागला आहे. मुंबईजवळच्या रायगड जिल्ह्यात तो वाढतोय. त्या तुलनेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे अजूनही त्याचा प्रादुर्भाव नसला तरी गणेशोत्सव काळात नागरिकांची होणारी ये-जा पाहता प्रशासनाने पुरेपूर काळजी घ्यावी आणि दक्ष राहावे अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिल्या.
तर, कोकणवासी दरवर्षी गणेशोत्सवासाठी गावी जातात, पण कोकणातल्या माणसांना आता गावी जाण्यासाठी काहीच व्यवस्था शासनाने केलेली नाही. परराज्यातल्या लोकांना पाठवलं, त्यांची व्यवस्था केली, ते जाऊन परत आलेही” असा टोला मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी लगावला. “गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या लोकांना अडचणी आहेत, तर बकरी ईद साजरा करणाऱ्यांना मात्र सोयी सुविधा करण्यात आल्या आहेत” अशी घणाघाती टीका देशपाडे यांनी केली होती.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

