🕒 1 min read
महाराष्ट्र देशा डेस्क : समंथा रुथ प्रभू आणि अक्षय कुमार ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये आले होते. यावेळी समंथाला नागा चैतन्यपासून विभक्त झाल्यानंतरचे त्यांचे आताचे संबंध कसे आहेत हे विचारले असता तिने खूपच आश्चर्यचकित करणारं उत्तर दिलं आहे. समंथा म्हणाली की, “जर तिला नागासोबत एका खोलीत बंद केले तर चाकू सारख्या गोष्टी लपवाव्या लागतील. कारण आमच्यात काहीही होऊ शकते”. यासोबतच तिने अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे.
नागा चैतन्यबरोबर तिच्या आताच्या नात्यावर बोलताना सामंथा म्हणाली कि, “नागा चैतन्यपासून वेगळे झाल्यानंतर खूप त्रास झाला. हे माझ्यासाठी खूपच कठीण होते, पण आता सर्वकाही ठीक आहे. मी आधीपेक्षा कणखर झाले आहे. आता तुम्ही आम्हा दोघांना एका खोलीत बंद केले तर तुम्हाला चाकू आणि चाकू सारख्या धारदार गोष्टी लपवाव्या लागतील कारण काहीही होऊ शकते. सध्या आमच्यात सर्व काही ठीक नाही, पण मला आशा आहे की कालांतराने सर्व काही ठीक होईल.”
250 कोटींची पोटगी मागितल्याचा अफवांवर समंथाने प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली कि, “ट्रोल करणाऱ्यांनी आधी 250 कोटींच्या पोटगीची स्टोरी बनवली, नंतर त्यांना वाटले की हे विश्वासार्ह वाटत नाही. म्हणून त्यांनी दुसरी स्टोरी बनवली की मी प्री-नप साइन केले आहे, त्यामुळे मी पोटगी मागूच शकत नाही. या सर्व अफवा खरंच छान आहेत.”
समंथा आणि नागा जवळपास तीन वर्षे डेट करत होते. त्यानंतर समंथाने ऑक्टोबर 2017 मध्ये नागा चैतन्यशी लग्न केले. लग्नाच्या 4 वर्षानंतर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दोघांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे वेगळे होण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांना अतिशय दुःख झाले होते.
महत्वाच्या बातम्या:
- Suhas Kande : आदित्य ठाकरे वाघ, पण मटण खायच्याऐवजी डाळ भात खाताहेत; सुहास कांदे यांचा पलटवार
- IND vs WI ODI : टीम इंडियाला मोठा झटका, स्टार खेळाडू जखमी; मालिकेबाहेर जाऊ शकतो
- Webseries | ‘मी पुन्हा येईन‘ चा ट्रेलर लाँच; दमदार डायलॉग आणि जबरदस्त अभिनयाची पर्वणी
- Gulabrao Patil : “आधीच दौरे केले असते तर आज ही वेळ आली नसती”; गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंना टोला
- IND vs WI 1st ODI : टीम इंडियाचे ‘हे’ ११ शिलेदार तयार..! एकहाती जिंकवून देऊ शकतात सामना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
