मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या मोठा सत्ताबदल झाला. महाविकास आघाडी सरकार कोसळलं. राज्यात नवं शिंदे सरकार स्थापन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होऊन आता दोन दिवस झाले आहेत. शिंदे यांनी ३९ आमदारांना सोबत शिवसेनेविरोधात आणि थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारलं आहे. यानंतर या सगळ्या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
यानंतर शरद पवार म्हणाले कि, राज्यातील शिंदे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. सरकार पाच ते सहा महिने टिकेल, त्यामुळे मध्यवर्ती निवडणुकीसाठी तयार राहा. आता विरोधी बाकावर बसणार असलो, तरी मतदार संघात जास्तीत जास्त वेळ द्या. शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी उघड होताना स्पष्ट होईल. त्यामुळे बंडखोर आमदार स्वगृही परतण्याची शक्यता आहे. सरकार पडलं तर मध्यवर्ती निवडणुका लागतील. त्यामुळे त्याची तयारी आतापासून करा, असं मोठं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
दरम्यान, शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेने त्यांना गटनेते पदावरून काढत त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती केली होती. यानंतर ही नेमणूक बेकायदा असल्याचा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला होता. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी चौधरींच्या गटनेतेपदी नेमणुकीला मान्यता दिल्याने हा वाद न्यायालयात गेला आहे. मात्र, आता एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदी मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे, शिवसेनेसाठी हा मोठा धक्का आहे.शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांना विधिमंडळ सचिवालयाने मोठा धक्का दिला आहे. अजय चौधरी यांची गटनेते म्हणून मान्यता रद्द करण्यात आली असून गटनेते म्हणून एकनाथ शिंदे हेच कायम राहतील, असे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ सचिवालयाने पाठवले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

