Share

Eknath Shinde : शिवसेनेला मोठा धक्का, विधिमंडळ सचिवालयाकडून गटनेतेपदी एकनाथ शिंदेंच्या निवडीला मान्यता

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होऊन आता दोन दिवस झाले आहेत. ३९ आमदारांना सोबत त्यांनी शिवसेनेविरोधात आणि थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारलं आहे. यानंतर शिवसेनेला शिंदेंकडून धक्क्यावर धक्के बसत आहेत. ३९ आमदारांनंतर आता १४ खासदारांनी देखील उद्धव ठाकरे यांना शिंदेंबरोबर जुळवून घ्या, असं मागणी पत्र दिल्याचा दावा भाजपच्या एका नेत्याने केला आहे.

यानंतर शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेने त्यांना गटनेते पदावरून काढत त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती केली होती. यानंतर ही नेमणूक बेकायदा असल्याचा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला होता. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी चौधरींच्या गटनेतेपदी नेमणुकीला मान्यता दिल्याने हा वाद न्यायालयात गेला आहे. मात्र, आता एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदी मान्यता देण्यात आली आहे.

त्यामुळे, शिवसेनेसाठी हा मोठा धक्का आहे.शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांना विधिमंडळ सचिवालयाने मोठा धक्का दिला आहे. अजय चौधरी यांची गटनेते म्हणून मान्यता रद्द करण्यात आली असून गटनेते म्हणून एकनाथ शिंदे हेच कायम राहतील, असे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ सचिवालयाने पाठवले आहे. यामुळे शिवसेनेच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!