मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार नागाअर्जुनचा मुलगा नागाचैतन्य आणि अभिनेत्री तसेच त्याची पत्नी समांथा यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून चालू होती. मात्र यावर दोघांनीही कोणतीचं माहिती दिली नव्हती. तर नुकतीचं समांथाने सोशल मीडिया पोस्टद्वारे एक पोस्ट शेअर करत घटस्फोट घेतल्याचे जाहीर केले आहे.
यावरच आता नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रनौतने हिने मोठे भाष्य केले आहे. कंगनाने नागाचैतन्य आणि समांथाच्या यांच्या घटस्फोटावर आपल्या इन्स्टाग्रामवर नुकतीच एक भली मोठी पोस्ट केली आहे. यावेळी तिने बॉलीवूडमधील सुपरस्टारवर निशाणा साधला आहे. ‘बॉलिवूडमधील एका घटस्फोट तज्ज्ञामुळे या दोघांचा घटस्फोट झाला आहे,’ अस वक्तव्य कंगने केलं आहे.
https://www.instagram.com/p/CUhawZvrPK9/?utm_source=ig_web_copy_link
या पोस्ट मध्ये कंगणा म्हणाली , ‘जेव्हा जेव्हा घटस्फोट होतो, तो नेहमीच पुरुषाचा दोष असतो, असं म्हणण फार पूर्वीच्या व्यक्तींच्या मताप्रमाणे वाटू शकते. मात्र देवाने पुरुष आणि स्त्रीची निर्मिती अशाचप्रकारे केली आहे. त्यामुळे या लोकांवर दया दाखवणं बंद करा. काही पुरुष हे कपड्यांप्रमाणे स्त्रियांना बदलतात आणि त्यानंतर ते सर्वात चांगले मित्र असल्याचे सांगतात. त्यामुळे अशाप्रकारच्या १०० पैकी १ महिला चुकीची असू शकते. मात्र संपूर्ण नाही,’ असे कंगनाने सांगितले.

पुढे कंगना म्हणाली, “ज्यांना प्रसारमाध्यम आणि चाहत्यांकडून प्रोत्साहन मिळते, अशा लोकांचा धिक्कार असो. ते त्या पुरुषांची स्तुती करतात आणि महिलांना मात्र दोष देतात. हल्ली घटस्फोटाची संस्कृती पूर्वीपेक्षा अधिक वाढत चालली आहे.’ असेही तिने म्हटले. कंगनाने दिलेल्या या प्रतिक्रियेनंतर मात्र, नेटकऱ्यांनी घटस्फोट तज्ज्ञाबद्दल अनेक तर्कविर्तक लढवले आहे. यातील अनेकांनी हा घटस्फोट तज्ज्ञ अभिनेता आमिर खान असल्याचे सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी आमिरने त्याची दुसरी पत्नी किरण रावपासून घटस्फोट घेतला होता.
काही दिवसांपूर्वी अमीर नागार्जुन आणि त्याच्या कुटुंबाला भेटायला गेला होता. आमिर खान आणि नागाचैतन्य हे दोघे लाल सिंह चड्ढा या चित्रपटात सोबत काम करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- सहकारी चळवळीसाठी अमित शहांचे योगदान चांगलं राहील- शरद पवार
- कथित ऑडिओ क्लिपमध्ये रामदास कदमांना फोनवर बोलणारे प्रसाद कर्वे आहेत तरी कोण?
- फडणवीसांना शिवसेना नेता भेटला, अन् देगलूर पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला!
- ‘कानून वापसी नहीं तो घर वापसी नही’, कृषी कायद्यावरून टिकैत यांचा केंद्राला इशारा
- ‘तो माझा आवाज नाही, व्हायरल ऑडिओ क्लिपची चौकशी करा’, प्रसाद कर्वेंची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

