Share

कथित ऑडिओ क्लिपमध्ये रामदास कदमांना फोनवर बोलणारे प्रसाद कर्वे आहेत तरी कोण?

Published On: 

मुंबई : शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे काम केले. परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्याबाबतची माहिती रामदास कदम यांनी प्रसाद कर्वे यांच्या माध्यमातून माहितीच्या अधिकाराखाली मिळवून भाजपचे किरीट सोमय्या यांना दिली, असा खळबळजनक आरोप मनसेचे राज्य सरचिटणीस आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केला आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. अशावेळी प्रसाद कर्वे नेमके कोण आहेत? असा सवाल विचारला जात आहे.

प्रसाद उर्फ बाळा कर्वे हे बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जात होते. कधीकाळी मातोश्रीवर प्रसाद कर्वे यांना थेट प्रवेश दिला जात होता. बाळा कर्वे असे ओळख असलेले प्रसाद कर्वे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुजारी म्हणून ओळखले जायचे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे मुळगाव मुरुड येथील रहिवासी असलेले प्रसाद कर्वे काही वर्ष मुंबईत काम केले. त्यानंतर प्रसाद कर्वे दापोलीत वास्तव्यास आहेत. कर्वे यांचा मुख्य व्यवसाय हा पौरोहित्य आहे. त्यांना एक मुलगा पुण्यात नोकरीला आहे. तर दुसऱ्या मुलाचा स्वत:चा टेम्पो आहे.

प्रसाद कर्वे हे २००५ पासून माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून काम करतात. बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक मी आहे, असा दावा ते करतात. दापोली तालुक्यातील प्रसाद कर्वे हे पूर्वी मुंबईत कामाला होते. मुंबईत त्यांनी दत्ता साळवी, दत्ता नलावडे आणि गजानन किर्तीकर सारख्या नेत्यांसोबत काम केले आहे. आतापर्यंत त्यांनी विविध कार्यालयात जवळपास १३ हजार माहिती अधिकार अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्या अर्जामुळे अनेक अधिकाऱ्यांवर कारवायाही झाल्या आहेत. त्यांच्या माहिती अधिकारामुळे अनेक लोकांना न्याय सुद्धा मिळाला आहे.

कधीकाळी ‘मातोश्री’वर प्रसाद कर्वे यांचा थेट संपर्क असल्याने शिवसेनेत त्यांच्या शब्दाला खूप वजन होते. माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जात होते. परंतु अलीकडे ते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. दापोली तालुक्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यावरील बेकायदेशीर सीआरझेडचे उल्लंघन करून बांधण्यात आलेल्या काही हॉटेल व्यवसायिकांची माहितीच्या अधिकारात त्यांनी माहिती मागवली होती.

प्रसाद कर्वे यांनीच किरीट सोमय्या यांना माहिती पुरवण्याच्या काही क्लिप व्हायरल झाल्याने अचानक प्रसाद कर्वे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याशी त्यांचा झालेला संवाद हा सुद्धा व्हायरल झाला आहे. त्यामुळे राज्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!