Share

‘तो माझा आवाज नाही, व्हायरल ऑडिओ क्लिपची चौकशी करा’, प्रसाद कर्वेंची मागणी

Published On: 

रत्नागिरी : शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे काम केले. परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्याबाबतची माहिती रामदास कदम यांनी प्रसाद कर्वे यांच्या माध्यमातून माहितीच्या अधिकाराखाली मिळवून भाजपचे किरीट सोमय्या यांना दिली, असा खळबळजनक आरोप मनसेचे राज्य सरचिटणीस आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केला आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

या कथित ऑडिओ क्लिपमध्ये नाव असलेले प्रसाद कर्वे यांनी मात्र हा आरोप फेटाळला आहे. ‘मी कोणतीही माहिती सोमय्यांना दिली नाही. सोमय्या आणि माझा संवाद नाहीच अशी भूमिका कर्वे यांनी मांडली. किरीट सोमय्यां यांनीच महावितण आणि प्रांत कार्यालयात माहिती अधिकारात अर्ज दाखल केला होता, असं कर्वे म्हणाले. तर ऑडिओ क्लिप बेकायदेशीरपणे बाहेर काढल्यात, असे मत कर्वे यांनी टिव्ही ९ शी बोलताना व्यक्त केले आहे.

‘माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग नाही, मी कुणाचे रेकॉर्डिंग ठेवत नाही, ऑडिओ क्लिप संदर्भातील आवाज माझा नाही. ऑडिओ क्लिपची तपासणी करावी, मी चौकशीला सामोरे जायला तयार आहे, असे ते म्हणाले आहेत. सोमय्या यांचा साधा नंबरही माझ्याकडे नाही. मी कधी सोमय्या यांच्यांशी बोललेलो नाही. ज्यांनी क्लिप काढल्या त्यांनी चौकशी करावी, आवाजाची चौकशी करावी’ असेही कर्वे म्हणालेत.

दरम्यान, रामदास कदम यांनीही या ऑडिओ क्लिप फेक असल्याचे सांगत या संभाषणाशी आपला काहीच संबंध नसल्याचे म्हटले आहे. तसेच हा आपल्या बदनामीचा कट असल्याचे ते म्हणालेत. मनसेच्या वैभव खेडेकरांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत. त्यात कोणतंही तथ्य नाही, असं म्हणत कदमांनी आरोप फेटाळून लावले. माझ्या मुलाविरुद्ध विधानसभा निवडणुकीत संजय कदम पराभूत झाले. तेव्हापासून ते सातत्यानं माझ्यावर आरोप करत आहेत.

वैभव खेडेकरांची भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं मी बाहेर काढली. त्यामुळे माझी बदनामी करण्यासाठी ते असे आरोप करतात. मी आधीच त्यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे आणि आता पुन्हा मानहानीचा दावा करणार आहे, असं कदम म्हणाले. तुळजाभवानीची शप्पथ घेऊन सांगतो, मी सोमय्यांशी संपर्क साधलेला नाही. जो माणूस माझ्या पक्षाच्या मुळावर उठलाय, त्याला पत्रकार परिषदेनंतर मला भेटायला घेऊन ये असं मी का बरं म्हणेन, असा सवाल रामदास कदमांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!