Share

फडणवीसांना शिवसेना नेता भेटला, अन् देगलूर पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला!

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती. आता या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. देगलूर विधानसभेसाठी 30 ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार आहे.

भाजपनं देगलूर बिलोली जागेसाठी शिवसेनेतील नाराज नेते सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. सुभाष साबणे शिवसेनेत नाराज होते, ते भाजपमध्ये प्रवेश करतील.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करत होते. यावेळी साबणे यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे. ‘अशोक चव्हाण यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. मी शिवसेनेवर नाराज नाही. परंतु आमच्या जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण यांच्यामुळे शिवसेनेला धोका आहे. म्हणूनच शिवसेना वाढत नाहीय’, असा आरोप साबणे यांनी केला आहे.

देगलूरचे माझी आमदार सुभाष साबणे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला नरसी नायगावमध्ये पोहचले होते. काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापुरकर यांच्या निधनानंतर या देगलूर बिलोली मतदारसंघात पोट निवडणूक होणार आहे. सुभाष साबणे लवकरच भाजपत प्रवेश करणार आहेत. देवेंद्र फडणवीस आणि सुभाष साबणे यांच्यात बंददाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!