🕒 1 min read
पुणे: केंद्र सरकारने सहकार खाते निर्माण केले आहे. आणि ते खाते केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे सोपवले आहे. दरम्यान यावरूनच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमित शहांवर विश्वास व्यक्त केला आहे. ते लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी प्रस्तुत सकाळ महा कॉन्क्लेव्ह नागरी व जिल्हा सहकारी पतसंस्थांच्या 3 दिवसीय महापरिषदेत बोलत होते.
यावेळी शरद पवार म्हणाले की, सहकार खाते अमित शहांकडे आहे. माझा आणि अमित शहा यांचा संपर्क ते सहकारी बॅंकेचे संचालक असताना आला होता. अनेक वर्ष या क्षेत्रात काम केलेल्या माणसाचा दृष्टीकोन चांगलाच असेल असं मला वाटतं. अशी आशा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
तर अमित शाह यांच्याशी माझी चर्चा झाली. सहकारी चळवळीसाठी त्यांचे योगदान चांगलं राहील, असं मला वाटतं. अमित शहा यांचं सहकारी बँका संदर्भातील धोरण अनुकूल राहील. ते अहमदाबाद सहकारी बँकेचे संचालक होते आमच्यासारखे लोक अमित शहा यांच्या पाठीशी उभे राहतील त्यामुळे सहकाऱ्याला कुठलाही धोका निर्माण होणार नाही. असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- विरोधी पक्षनेते जरा उशीरा जागे झाले; पूरग्रस्त पाहणीवरुन जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला
- ममता बॅनर्जींचा आज होणार फैसला; पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीला सुरुवात
- शतकापूर्वीचं ऋतुराजचं सेलिब्रेशन; सर्वांनाचं झाली गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्राची आठवण
- ‘अतिवृष्टी मध्ये शेतकऱ्यांची माती झाली, आज खरी ताकदीची गरज कोणाला आहे कोल्हे साहेब?’
- उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्याचा विनायक राऊतांना विसर; अशोक चव्हाणांना म्हणाले ‘मुख्यमंत्री’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
