🕒 1 min read
उस्मानाबाद : ज्या भाजपने २०१२ मध्ये शेतकरी कायद्यांना विरोध केला होता तेच कायदे २०२० मध्ये मंजूर केले. हे सरकार अंबानी-अदानींचे आहे. शेतकऱ्यांवर लादलेल्या तिन्ही कायदे रद्द केल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. बंदूक, दडपशाही करूनही आम्ही मागे हटणार नसल्याचे दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांनी सांगितले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथे शनिवारी गांधी जयंती व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘किसान संवाद परिषद’चे आयोजन केले होते. यावेळी टिकैत यांनी थेट भाजप सरकारवर निशाणा साधत शेतकऱ्यांना रसातळाला घालण्यासाठीच असे कायदे केले. सरकारविरोधात शेतकऱ्यांनी एकत्र येत मोठा लढा उभारण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारने कृषी विषयात आणलेले तीन काळे कायदे अन्यायकारक असून त्या विरोधात शेतकरी आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित या परिसंवादात बोलताना टिकैत म्हणाले, ‘केवळ पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशचे लोक आंदोलनात आहेत असे म्हणणे म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधण्यासारखा प्रकार असेल. देशातील प्रत्येक राज्यातील नागरिक दिल्ली आंदोलनात सहभागी आहेत. गेल्या दहा महिन्यांत ७५० शेतकरी आंदोलनादरम्यान शहीद झाले आहेत. तरीही हे हुकूमशाही सरकार काळे कायदे परत घेत नाही. ‘कानून वापसी नहीं तो घर वापसी नही’, असे सांगत केंद्र सरकारला आमच्या मागण्या मान्य कराव्या लागतीलच असेही ते म्हणाले.
तसेच हे आंदोलन केवळ शेतकऱ्यांचे नव्हे, तर देशातील नवतरुणांचेही आहे. यात तरुणांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. आम्ही तीन कायद्यांपासून देश वाचवण्याचा प्रयत्न करत होतो, पण आता पूर्ण देशालाच वाचवायची गरज आहे. एलआयसी, भारत पेट्रोलियम अशा फायद्यातील स्वायत्त संस्था विक्रीला काढून देश विकण्याचा विडा सरकारने उचलला आहे. सरकारवर आता सर्वसामान्यांचा विश्वास नसल्याचे हरियाणातील शेतकऱ्यांचे नेते युधवीर सिंह यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या:
- विरोधी पक्षनेते जरा उशीरा जागे झाले; पूरग्रस्त पाहणीवरुन जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला
- ममता बॅनर्जींचा आज होणार फैसला; पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीला सुरुवात
- शतकापूर्वीचं ऋतुराजचं सेलिब्रेशन; सर्वांनाचं झाली गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्राची आठवण
- ‘अतिवृष्टी मध्ये शेतकऱ्यांची माती झाली, आज खरी ताकदीची गरज कोणाला आहे कोल्हे साहेब?’
- उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्याचा विनायक राऊतांना विसर; अशोक चव्हाणांना म्हणाले ‘मुख्यमंत्री’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
