Share

‘सलमान खुर्शीद हे पुरुष वेषातील कंगना रणौत’, संजय राऊत आक्रमक

Published On: 

मुंबई : माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या नवीन पुस्तकातील हिंदुत्वाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.खुर्शीद यांनी त्यांच्या पुस्तकात, सद्य:स्थितीतील हिंदुत्वाची तुलना ‘आयसिस’ व ‘बोको हराम’ या दहशवादी संघटनांच्या जिहादी विचारांशी केली आहे. दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलत असतांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यामुद्द्यावरून संताप व्यक्त केला असून हे तर पुरुष वेषातील कंगना रणौत असल्याचा टोला लगावला आहे.

यावेळी बोलत असतांना राऊत म्हणाले की,’ते पुरुष वेषातील कंगना आहेत. अशा प्रकारची वक्तव्यं करुन काँग्रेस पक्षातील काही जुने जाणते म्हणवणारे काँग्रेस आणि राहुल गांधींना सतत अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. ते विद्वान आहेत, पुस्तकं लिहितात, एखादी ओळ हिंदुत्वावर टाकतात आणि वाद निर्माण करुन आपल्या पोळ्या भाजतात. हिंदू धर्माला “आयसिस’ व ‘बोको हराम’ उपमा देणं हेसुद्धा कंगनाने केलेल्या देशाच्या अपमानासारखाच आहे.’

दरम्यान, ‘हिंदुत्वाने काय केले आहे? काही लोक चुकीचे वागले असतील. जसे इस्लाम आणि इतर धर्मात आहे म्हणून त्याचं खापर संपूर्ण हिंदुत्वावर फोडणं ही मुर्खांची लक्षणं आहेत. आम्ही याचा निषेध आणि धिक्कार करतो. काँग्रेसदेखील यावर भूमिका स्पष्ट करेल याची खात्री आहे. हे व्यक्तिगत मत असलं तरी ते काँग्रेसचे नेते आहेत. पक्ष अडचणीत यावा यासाठी अशी विधानं केली जात आहेत का हे पहावं लागेल’, असेही राऊत यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!