Share

सुसाइड नोट लिहून काँग्रेस आमदाराच्या मुलाची आत्महत्या

Published On: 

🕒 1 min read

जबलपूर : जबलपूरच्या बरगी मतदारसंघातील आमदार संजय यादव यांचा मुलगा विभू यादव(वय १६)याने घरी लायसन्स असलेल्या पिस्तूलातुन स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. या घटनेमुळे आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच घटनास्थळी सुसाईड नोट सापडली असून त्यात माझे आई, वडिल, भाऊ सगळे चांगले आहेत. मला त्यांचा काही त्रास नाही. मी माझ्या मित्रांकडे जात आहे, असे लिहिले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विभूने डोक्यात गोळी मारून घेत आत्महत्या केली. गोळीच्या आवाजाने घरातले जेव्हा त्याच्या खोलीकडे आले तेव्हा विभू रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु विभूचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, आत्महत्येची माहिती मिळताच एफएसएलची टीम आमदार यादव यांच्या घरी पोहोचली. आत्महत्येच्या कारणांचा शोध आणि घटनास्थळी तपास केला जात आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्येपूर्वी विभूने मित्रांना मेसेज पाठवले होते. त्यात लिहिले होते की, ‘तुम्ही सर्वजण चांगले आहात. स्वत:ची काळजी घ्या.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!