🕒 1 min read
मुंबई: ICC ने गुरुवारी रावळपिंडी येथील रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीसाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्टीला “सरासरीपेक्षा कमी” असे रेट केले आहे. यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चे अध्यक्ष रमीझ राजा यांनी पहिल्या कसोटीतील खेळपट्टीवर एक विधान जारी केले, जिथे त्यांनी सांगितले की ते “वेगवान किंवा उसळत्या खेळपट्ट्या” तयार करू शकत नाहीत आणि ऑस्ट्रेलियासाठी परिस्थिती अधिक अनुकूल बनवू शकत नाहीत.त्यांच्या या विधानावर एका माजी पाकिस्तानी खेळाडूने हल्ला चढवला आहे.
पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने (Danish kaneria) रमीझ राजाला (ramiz raja) फटकारले आहे. “रमीझ राजा आज जे काही बोलले ते एक फालतू निमित्त आहे आणि त्यांनी पाकिस्तानी चाहत्यांची दिशाभूल केली आहे. त्याने खोटे बोलत चाहत्यांचा विश्वासघात केला आहे. ठीक आहे, तो त्याच्या मुलाच्या लग्नात व्यस्त होता. त्याने लग्नाला हजेरी लावली पण नंतर डेड विकेटवर चर्चा होताना त्याला दिसली. इतक्या वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया पाकिस्तानच्या दौऱ्यावर येत असल्याने या कसोटीकडे खूप लक्ष वेधले गेले, पण त्यासाठी त्यांनी कोणती विकेट बनवली?”
कनेरियाने बाबर आझमवरही (babar azam) हल्ला चढवत त्याला “कमकुवत कर्णधार” म्हणून संबोधले आहे. “तुला कशाची भीती वाटत होती? तुमच्याकडे गोलंदाज होते, पण तुम्ही त्यांना खेळवले नाही. तुमच्याकडे कमकुवत कर्णधार आहे जो संघाचे नेतृत्व करताना आक्रमक होऊ शकत नाही. ही विकेट इतकी खराब होती की या वयातही रमीझ राजानेही त्यावर धावा केल्या असत्या,” ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानच्या पहिल्या कसोटी सामन्यात पाच दिवसांच्या कालावधीत केवळ १४ विकेट पडल्या, ज्यात ऑस्ट्रेलियाने केवळ चार विकेट घेतल्या. तसेच सामना ड्रॉ झाला.
महत्वाच्या बातम्या
- “पराभवापेक्षा विजय पचवणे कठीण; भाजपला या विजयाचे अजीर्ण होऊ नये”, शिवसेनेचा टोला
- “सिद्धूने तर काम चोख केल, आता नाना मागे राहून कस चालेल?”, केशव उपाध्येंचा हल्लाबोल
- PAK vs AUS: आयसीसीकडून रावळपिंडी पीचला डीमेरीट पॉईंट मिळाल्यानंतर रमीझ राजाचे मोठे वक्तव्य; म्हणाले…
- पाच राज्यांतील निकालांचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?; शिवसेनेने म्हटले, “माकडांच्या हाती दारूची बाटली आल्यावर …”
- गोव्यात भाजपच्या विजयानंतर ; आज मुंबईत होणार फडणवीसांचे जल्लोषात स्वागत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
