मुंबई : पाच राज्यांच्या निवडणूक निकालात पंजाब वगळता चार राज्यात भाजपला दणदणीत विजय प्राप्त झाला असून भाजपला टक्कर देण्यासाठी गोवा आणि उत्तर प्रदेशात उमेदवार उतरवणाऱ्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून आता भाजप नेत्यांकडून विरोधकांवर निशाणा साधण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी विरोधकांवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच राजकारणात ५० वर्ष घालवूनही विरोधकांकडे कसलेही अनुभव नाहीत, असा खोचक टोलाही पाटलांनी लगावला आहे.
यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘भारतीय जनता पार्टीला एवढं मोठं यश मिळणं अपेक्षितच होतं. ५० वर्ष राजकारणात घालवूनही विरोधकांकडे कसलेही अनुभव नाहीत, हेच या निवडणुकीत पाहायला मिळालं’, असे पाटील म्हणाले.
भारतीय जनता पार्टीला एवढं मोठं यश मिळणं अपेक्षितच होतं. ५० वर्ष राजकारणात घालवूनही विरोधकांकडे कसलेही अनुभव नाहीत, हेच या निवडणुकीत पाहायला मिळालं. भाजपाची ही विजयी घोडदौड २०२४ मध्येही सुरूच राहणार आहे.https://t.co/WgYGjdbau0#BJPAgain #BJP
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 10, 2022
दरम्यान, भाजपची ही विजयी घोडदौड २०२४ मध्येही सुरूच राहणार आहे, असा दावाही यावेळी चंद्रकांत पाटलांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
गोव्यात भाजपच्या विजयानंतर ; आज मुंबईत होणार फडणवीसांचे जल्लोषात स्वागत
PAK vs AUS: आयसीसीकडून रावळपिंडी पीचला डीमेरीट पॉईंट मिळाल्यानंतर रमीझ राजाचे मोठे वक्तव्य; म्हणाले…
“सिद्धूने तर काम चोख केल, आता नाना मागे राहून कस चालेल?”, केशव उपाध्येंचा हल्लाबोल
“पराभवापेक्षा विजय पचवणे कठीण; भाजपला या विजयाचे अजीर्ण होऊ नये”, शिवसेनेचा टोला


