Share

सैफ अली खानच्या ‘त्या’ वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काही दिवसांपूर्वीच अभिनेता सैफ अली खान, राणी मुखर्जी यांचा ‘बंटी और बबली’च्या सिक्वेल या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा देखील सुरू आहे. सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेला सैफ एका कार्यक्रमात असं काही बोलला की सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून सर्वांना धक्काच बसला.

नुकतीच या संपूर्ण टीमनं लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली होती. ज्याचा प्रोमो प्रदर्शित झाला असून यातील सैफ अली खानच्या एका वाक्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या शोमध्ये कपिल शर्माच्या एका प्रश्नाचं उत्तर देताना सैफनं ‘मी जास्त काळ घरी राहिलो तर माझ्या मुलांची संख्या वाढेल’ असं वक्तव्य केलं आहे. या शोमध्ये हजेरी लावलेल्या सैफला सतत कामात व्यस्त राहण्याचं कारण विचारलं. ‘तुला आधीपासूनच असं कामात व्यस्त राहायला आवडतं की तू तुझ्या दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर कुटुंब वाढल्यामुळे जास्त काम करत आहेस?’ असा मजेदार प्रश्न यावेळी कपिल शर्मानं विचारला.

‘मी स्वतःला यासाठी कामात व्यस्त ठेवतोय कारण मला भीती वाटते की मी घरी राहिलो तर माझ्या मुलांची संख्या वाढेल.’ सैफचं हे मजेदार उत्तर ऐकताच सर्वांनाच हसू आवरेनासं झालं.‘बंटी और बबली २’ हा चित्रपट येत्या १९ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सैफ आणि राणी मुखर्जी यांच्यासोबत गली बॉय फेम अभिनेता सिद्धार्थ चतुर्वेदी आणि अभिनेत्री शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!