औरंगाबाद : औरंगाबादच्या सफारी पार्कची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. आता तांत्रिक मुल्यांकनानंतर औरंगाबादच्याच कंपनीच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आलीय. नाशिक रस्त्यावरील मिटमिटा इथल्या शंभर एकर जमिनीवर हे सफारी पार्क उभारले जाणार आहे. या संपूर्ण परिसराला किल्ल्यासारखे स्वरुप दिले जाणार आहे. या कामाच्या निविदेस पालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी नुकतीच मंजुरी दिली.
यासाठी आलेल्या १७ कंपन्यांमधून औरंगाबादच्याच अमान कन्स्ट्रक्शन कंपनीला पहिल्या टप्प्यातील कामाचे कंत्राट देण्यात आलंय. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड कंपनीकडून या कामासाठी १४७ कोटींचा निधी देखील मंजूर झालाय. पहिल्या टप्यातील १५ कोटींची पहिली निविदा काढण्यात आली होती.
पहिल्या टप्प्यात होणार ही कामे : पहिल्या टप्प्यात सफारी पार्कची संरक्षण भिंत बांधणे, जमिनीचे सपाटीकरण ही कामे करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात सफारी पार्कच्या विविध कामांचा समावेश करून त्याचेही नियोजन प्रशासनाने सुरू केले आहे. त्याचीही निविदा येत्या काही दिवसांत काढली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्रातील सत्ता गेल्यानंतर भाजपला देखील आंदोलने करावी लागतील; संजय राऊतांचा मोदींवर निशाणा
- अंकिताने साजरा केला बॉयफ्रेंड विकी सोबत असा ‘व्हॅलेंटाईन डे’
- राज्यपालांसोबत शीतयुद्ध नाही, तर खुलं वॉर सुरु आहे – संजय राऊत
- IndvsEng : पराभवानंतर दुसऱ्या कसोटीत भारताची भक्कम स्थिती !
- ठाकरे सरकारच्या राज्यात महिला खरंच सुरक्षित आहेत का ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

