Share

पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा अजब दावा ; म्हणाला “पीचबद्दल कम्प्लेंट असेल तर क्रिकेट खेळणे सोडा”

Published On: 

मुंबई: २८ वर्षांनंतर होत असलेल्या ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा पीचच्या दुरवस्थेमुळे खूप प्रभावित झाला आहे. रावळपिंडीतील पहिला कसोटी सामना पाच दिवसांत केवळ तीन डावांत अनिर्णित राहिला. नंतर, आयसीसीने त्याला ‘सरासरीपेक्षा कमी’ रेट केले आणि स्थळाला डिमेरिट पॉइंटसह दंड ठोठावला. कराचीतील दुसरी कसोटी अधिक मनोरंजक होती कारण यजमानांनी अंतिम डावात लढाऊ मनोवृत्तीचे प्रदर्शन केले. मात्र, अपेक्षित निकाल मिळू शकला नाही. यामुळे पाकिस्तानच्या पीचवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

दरम्यान, पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू सईद अजमलने (saeed ajmal) सपाट पीचवर टीका करणाऱ्या विधानांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तो म्हणाला की पीचबाबत तक्रार करणाऱ्या कोणत्याही गोलंदाजाने कसोटी क्रिकेट खेळणे सोडले पाहिजे. “विकेट घेण्यासाठी तुमच्या स्वभावाची गरज असते. फलंदाजांसोबत मनाचा खेळ खेळण्यासाठी तुम्हाला८ -१० षटके चांगली टाकावी लागतील आणि मग तुम्ही तुमची योजना पूर्ण करू शकाल. सपाट पीचबद्दल तक्रार करायची असेल तर क्रिकेट सोडावे. स्पिनर पीच बघून गोलंदाजी करणार असेल तर मग स्पिनर होण्यात काय अर्थ आहे? स्पिनरने सर्व परिस्थितीत कामगिरी करायला शिकले पाहिजे.”

अजमलने सांगितले केले की पाकिस्तानकडे नेहमीच स्पिनसाठी अनुकूल ट्रॅक असतात हे खरे नाहीये.“पाकिस्तानकडे नेहमी स्पिन विकेट्स असतात हा समज कधीच नव्हता. आम्ही युएईमध्ये खेळत असतानाही आम्हाला चेंडू फिरवावा लागला आणि ते केवळ जादूने घडले नाही,” अजमलच्या या वक्तव्याने पुन्हा पीच वरील चर्चाना हवा दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!