Share

“पाठीशी घालणारे आपलेच सरकार…”, ‘त्या’ घटनेवरून भातखळकरांचा राष्ट्रवादीवर निशाणा 

Published On: 

मुंबई: भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव पोलिस ठाण्यात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुमेद श्यामकुंवर (Sumed shyamkunvar) यांच्यावर अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या १०  वर्षा पासून ते राष्ट्रवादी पक्षासाठी काम करत आहेत. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

“भंडारा वसतिगृहात राहणाऱ्या इयत्ता १० वीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा, राष्ट्रवादीचा नेता आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुमेध श्यामकुवर याने हॉस्टेलमध्ये नेण्याच्या बहाण्याने विनयभंग केलाय आहे. पाठीशी घालणारे आपलेच सरकार आहेत याची खात्री आहे त्या नराधमाला.”, अशी टीका भातखळकर यांनी ट्वीट करत केली आहे.

दरम्यान सुमेद श्यामकुंवर यांना नुकत्याच झालेल्या भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा शहरातील एका गर्ल्स हॉस्टेलमध्ये पिडीत मुलगी शिक्षणासाठी राहत होती. तर राष्ट्रवादीचे नेते सुमेद श्यामकुंवर हे या हॉस्टेलचे संचालक आहेत. २५ फेब्रुवारीला सायंकाळी सुमेद श्यामकुंवर यांनी पिडीत मुलीच्या वडीलांना कॉल करत आपण त्यांच्या मुलीला हॉस्टेलवर घेऊन जाण्यासाठी आलो असल्याचे सांगत तिला घेऊन गेले आणि तिचा विनयभंग केला. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!