🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी हिंसक आंदोलन केलं होतं. या आंदोलन प्रकरणी सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे. सदावर्ते यांनी चिथावणीखोर भाषणे केल्याचा आणि षडयंत्र रचण्याचा गुन्हा दाखल झाला होता.
‘सिल्वर ओक’ निवासस्थान हल्लाप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत आज संपत असल्याने पोलिसांनी सदावर्तेंना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबतच इतर 109 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 17 एप्रिलपर्यंत सातारा पोलिसांना न्यायालयाने कारागृहातून गुणरत्न सदावर्तेंचा ताबा घेण्याची परवानगी दिली. सदावर्तेंचा वकिल आज तिसऱ्यांदा बदलण्यात आला आहे. आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सुर्यवंशीला 16 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदावर्तेंचा जामीनासाठी अर्ज करण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता सदावर्तेंन न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल करता येणार आहे.
साताऱ्यातलं नेमकं प्रकरण काय?
मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणविरोधी भूमिका घेतली होती. यावरून वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्याच प्रकरणी साताऱ्यात गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आता हेही प्रकरण पुन्हा गाजण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईतल्या एसटी आंदोलनाने सदावर्तेच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. सातारा पोलीस आजच सदावर्तेना घेऊन साताऱ्याला रवाना होण्याची शक्यता आहे. गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांना देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या –
IPL 2022 : पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये रोहितला खुणावतोय ‘विराट’ विक्रम; आज फक्त २५ धावा करताच….
गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
मोठी बातमी! नवाब मलिकांची संपत्ती ईडीकडून जप्त
IPL 2022 : “जोपर्यंत RCB आयपीएल ट्रॉफी जिंकत नाही, तोपर्यंत…”, भर मैदानात ‘तिनं’ घेतली शपथ!
“राऊत राष्ट्रवादीचा भोंगा”; संदीप देशपांडे यांचा राऊतांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
