मुंबई: नवाब मलिकांची संपत्ती ईडी कडून आज जप्त करण्यात अली आहे. एकूण आठ प्रकारची मालमत्ता इडीकडून जप्त करण्यात आली आहे. कुर्ल्यातील गोवावाला कंपाउंड, वांद्रे येथील तीन फ्लॅट व दोन राहती घरे , तसेच उस्मानाबाद मधील १४८ एकर जमीन जप्त करण्यात आली आहे. अशा एकूण आठ मालमत्तांवर ईडीने जप्त केली आहे.
मलिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर असलेल्या मालमत्तांची माहिती ईडी घेत होती. कोणकोणत्या संपत्तीच्या माध्यामातून मलिक यांच्या कंपन्यांना आर्थिक लाभ होत होता, याची छाननी ईडीकडून करण्यात येत होती. या दरम्यान वांद्रे परिसरात ईडीची टीम गेली होती. तसेच उस्मानाबादमध्येही ईडीने तपासणी केली. यामुळे नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
दाउद इब्राइम आणि त्याच्या सबंधीतांकडून आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप नवाब मलिकांवर होता. त्यानुसार यूपीएच्या कलम १०२ बी, कलम १७, १८, २०, २१, ३८ आणि ४० नुसार तक्रार नोंदवण्यात आली होती.
दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये दाउद इब्राहीम, हाजी अनिस, शकील शेख, जावेद पटेल टायगर मेनन, जावेद चिकना यांना संशयित आरोपी ठरवण्यात आले होते.
चौकशीतून काय आलं समोर –
हसीना पारकर आणि नवाब मलिक यांनी एकत्र येऊन गुन्हेगारी कृत्य केल्याचे ईडीचे म्हणणे आहे. हसीना पारकर, सरदार शाहवली खान, सलिम पटेल आणि नवाब मलिक यांच्यावर गोवावाला कंपाऊंडची तीन एकर जमीन हडप केल्याचा ठपका आहे.
महत्त्वाच्या बातम्या :


