Share

IPL 2022 : “जोपर्यंत RCB आयपीएल ट्रॉफी जिंकत नाही, तोपर्यंत…”, भर मैदानात ‘तिनं’ घेतली शपथ!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ मध्ये मंगळवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. या सामन्यात चेन्नईने बंगळुरूला २३ धावांनी हरवले. या सामन्यादरम्यान बंगळुरूची एक ‘पोस्टर गर्ल’ चांगलीच व्हायरल होत आहे. आपला संघ जिंकावा यासाठी, चाहते काय आण घेतील, याचा प्रत्यय सामन्यादरम्यान आला.

या सामन्यात आरसीबीची एक चाहती उपस्थित होती तिने ‘आरसीबी आयपीएल जिंकत नाही, तोपर्यंत लग्नच करणार नाही’ असे लिहलेले पोस्टर आणले होते. सध्या या पोस्टर गर्लचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या या सामन्यादरम्यान जेव्हा कॅमेऱ्याची नजर या पोस्टर गर्लवर गेली, तेव्हा तिच्या हातातील पोस्टर सगळ्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. आरसीबीने अद्याप एकदाही आयपीएलचे जेतेपद जिंकलेले नाही.

https://twitter.com/Liateoffl/status/1513943409324883971

यंदाच्या मोसमात फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वात आरसीबीने आतापर्यंत चार सामने खेळले असून त्यातील त्यांनी तीन सामने जिंकले आहेत. यापूर्वी संघाचे कर्णधारपद विराट कोहलीच्या हातात होते. पण तो संघाला आयपीएलचे एकही विजेतेपद मिळवून देऊ शकला नाही. यावेळी नवा कर्णधार आयपीएल ट्रॉफी जिंकून देईल, अशी आशा आरसीबीच्या चाहत्यांना आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!