Share

IPL 2022 : पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये रोहितला खुणावतोय ‘विराट’ विक्रम; आज फक्त २५ धावा करताच….

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला आत्तापर्यंत चांगली कामगिरी करता आली नाही. मुंबईने आतापर्यंत खेळलेले चारही सामने गमावले असून, संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. दुसरीकडे, रोहितची बॅटही आतापर्यंत शांत आहे. या मोसमात त्याने आतापर्यंत एकही अर्धशतक झळकावलेले नाही. रोहितने ४ सामन्यात ८० धावा केल्या आहेत.

आयपीएल २०२२ मध्ये रोहितची सर्वोत्तम धावसंख्या ४१ आहे. त्याने आतापर्यंत ८ चौकार आणि ४ षटकार मारले असून त्याची सरासरीही २० आहे. मात्र, पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात त्याला टी-२० क्रिकेटमध्ये मोठा विक्रम करण्याची संधी असेल. यात तो यशस्वी ठरला तर विराट कोहलीनंतर अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय ठरेल.

पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माला टी-२० क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यात रोहितने २५ धावा केल्या तर त्याच्या टी-२०मध्ये १० हजार धावा पूर्ण होतील. ही कामगिरी करणारा तो विराट कोहलीनंतरचा दुसरा भारतीय फलंदाज ठरणार आहे. विराटने आतापर्यंत ३३० टी-२० सामन्यांमध्ये १०३७९ धावा केल्या आहेत. त्याने ५ शतके आणि ७६ अर्धशतके केली आहेत आणि टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो पाचव्या स्थानावर आहे. रोहितने आतापर्यंत ३७४ टी-२० सामन्यांमध्ये ९९७५ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने ६ शतके आणि ६९ अर्धशतके केली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!