मुंबई : सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते आणि इतर आठ जणांना आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. तर मुंबई पोलीस सदावर्तेंची पोलीस कोठडी वाढवून घेण्याचा प्रयत्नात असल्याचे बोलले जात होते. याशिवाय साताऱ्यातही त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने सातारा पोलीसही सदावर्तेंचा ताबा मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
त्यासाठी ते दोन दिवसांपूर्वीच मुंबईत दाखल झाले. सातारा पोलीस आज सुनावणीवेळी सदावर्तेंच्या अटकेचे वॉरंट घेऊनच न्यायालयात उपस्थित राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती. त्यामुळे आज न्यायालय सदावर्तेंची सुटका करणार की त्यांच्या अडचणी वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या प्रकरणा संदर्भात निर्णय झाला आहे. ‘सिल्वर ओक’ निवासस्थान हल्लाप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत आज संपत असल्याने पोलिसांनी सदावर्तेंना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सदावर्ते यांचा नेमका गुन्हा काय –
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी हिंसक आंदोलन केलं होतं. या आंदोलन प्रकरणी सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे. सदावर्ते यांनी चिथावणीखोर भाषणे केल्याचा आणि षडयंत्र रचण्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
महत्वाच्या बातम्या –


