मुंबई : राज ठाकरे यांची काल मंगळवारी ठाण्यात ‘उत्तर सभा’ झाली. यावेळी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली गेली. सध्या आरोप प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना पाहायला मिळत आहेत.
काल राज ठाकरेंनी जितेंद्र आव्हाडांवर चांगलाच निशाणा साधला होता. जितेंद्र आव्हाडांचा चेहरा नागानं फणा काढावा असा असल्याचा टोला थेट लगावला. दरम्यान त्यांच्या या टीकेला जितेंद्र आव्हाडांनी चांगलंच प्रत्युत्तर दिलं. प्रसारमाध्यमांशी बोलताना आव्हाड म्हणाले, तुम्ही इतरांच्या चेहऱ्यावर जाता इतरांच्या नाकावर जाता इतरांच्या रंगावर जाता म्हणजे तुमच्यामध्ये तो वर्णद्वेष किती ठासून भरलेला आहे हे लक्षात येत आहे. व्यंग रंग हे कधीही काढायचे नसतात मनुष्य जीवनामध्ये. आम्ही जर म्हंटल तुम्ही खूप धुरफुटे झाला आहात, तुमचं तोंड बघा कसा सुजलंय आवडेल तुम्हाला? असे प्रतित्तुर आव्हाड यांनी राज ठाकरेंना दिले.
यावर संदीप देशपांडे म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांनी तोंड बंद ठेवावे. त्यांनी राजकीय टिपण्णी करावी, पण वैयक्तिक बोलू नये. नाहीतर आम्ही ही येऊर च्या गोष्टी बाहेर काढू. राष्ट्रवादी काँग्रेसचे हे पुरवठा मंत्री आहेत. राष्ट्रवादीचे हे केष्टो मुखर्जी असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
यासह संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांवर देखील चांगलाच टोला लगावला. संजय राऊत हा राष्ट्रवादी भोंगा आहे. बाळासाहेब यांच्याकडे निष्ठावंत लोक होते. शिवसेनेकडे आता निष्ठावंत नाहीत म्हणून ते अल्टिमेटम देऊ शकत नाहीत. शिवराळ भाषेवर आक्षेप आहे ती कुणालाही बोलू नये. संजय राऊत यांनी कारकुनी करावी. त्यांना ईडीची नोटीस आल्याने त्यांची धांदल उडालीय. अशी थेट टीका केली.
महत्वाच्या बातम्या –


