मुंबई : विधानपरिषदेत राज्यपालांना एकूण १२ व्यक्ती आमदार म्हणून नामनिर्देशित करण्याचा अधिकार असतो.राज्य विधान परिषदेच्या १२ नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्त्या ह्या जून महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबल्या होत्या. यानंतर, काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन १२ व्यक्तींच्या नावाची यादी सुपूर्द केली होती.
नावं सुपूर्द केल्यानंतरही राज्यपालांनी बराच काळ घेतल्यामुळे ते महाविकास आघाडीने शिफारस केलेल्या नावांवर हरकत घेऊन शकतात अशी शक्यता वर्तवली जात असतानाच रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी आज राज्यपालांची भेट घेतली आहे. राज्यपालांची भेट घेत सदाभाऊ खोतांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी दिली आहे.
या १२ जणांच्या यादीत त्यांनी प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती देशमुख इंदोरीकर महाराजांचा देखील समावेश केला आहे. सद्या एका वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदोरीकर महाराजांवर न्यायालयात खटला सुरु असतानाच इंदोरीकर महाराजांच्या नावाची शिफारस थेट आमदारकीसाठी केल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.
भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यासंदर्भात ‘महाराष्ट्र देशा’ला प्रतिक्रिया दिली आहे. ‘सदाभाऊ हे चळवळीतून पुढे आलेले नेते आहेत. कीर्तनातून महिलांचा वारंवार अपमान करणाऱ्या इंदोरीकरांची आमदारकीसाठी राज्यपालांकडे शिफारस करणे म्हणजे जनमाणसातील स्वतःची किंमत कमी करून घेतली.’ अशी टीका त्यांनी केली आहे.
‘मुलगा-मुलगी यांच्यात भेद केल्यावरून ज्यांच्यावर न्यायालयात खटला सुरु आहे, त्यांची शिफारस करणाऱ्यांची देखील पुढे तपासणी करावी लागेल. इंदुरीकरांना आमदार करून त्यांना विधान परिषदेत पाठवल्यानंतर तिथे देखील महिलांबद्दल शिव्या ऐकायच्या आहेत का?’ असा सडेतोड प्रश्न करत त्यांनी या शिफारशीचा निषेध केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ठाण्यात पोलिसांनी मोर्चा रोखल्यानंतर मनसेचा राडा; मनसे नेते ताब्यात
- काँग्रेसच्या ‘या’ माजी मंत्र्याला तीन दिवसांची सीबीआय कोठडी
- वेळ पडल्यास ओबीसींच्या मागण्यासाठी राज्यभर महामोर्चे काढू : वडेट्टीवार
- ‘ते’ पुस्तक पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूचं आहे : नवाब मलिक
- मोदींनी दिएगो मॅराडोनाच्या निधनाबद्दल व्यक्त केले दुःख; म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

