Share

ठाण्यात पोलिसांनी मोर्चा रोखल्यानंतर मनसेचा राडा; मनसे नेते ताब्यात

Published On: 

🕒 1 min read

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाढीव वीजबिल माफीसाठी आक्रमक झाली असून राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटमचा कालावधी देखील पूर्ण झाला आहे. त्यामुळे मनसेने राज्यातील विविध शहरात आंदोलनाची हाक दिली होती. आज हे आंदोलन करण्यात येत असून ठिकठिकाणी पोलीस आणि कार्यकर्त्यांच्यात संघर्ष निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

ठाण्यामध्ये मनसे नेते अभिजित पानसे आणि अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात हजारो मनसैनिक व महिला या मोर्चामध्ये सामील झाल्या आहेत. मात्र, हा मोर्चा सुरु होताच पोलिसांनी या कार्यकर्त्यांना रोखलं. त्यामुळे काही काळ पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की देखील झाली. यानंतर, पोलिसांनी अभिजित पानसे यांच्यासह अविनाश जाधव व प्रमुख नेत्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

राज्यभरात पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. यासह कालपासूनच कार्यकर्त्यांना कलम १४९ अंतगर्त नोटीशी देखील देण्यात आल्या होत्या. अभिजित पानसे म्हणाले, ‘केवळ मोजके कार्यकर्ते आणि पदाधिकारी मिळून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन देण्यासाठी परवानगी मागत होतो. मात्र, अधिक पोलीस बळ मागवून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.’

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!