🕒 1 min read
नवी दिल्ली : अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन झाले. मॅराडोना यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मॅराडोनाच्या अनेक चाचण्या हॉस्पिटलमध्ये घेण्यात आल्या. एका स्कॅनमध्ये मेंदूत ब्लड क्लोट होण्याची बाब उघडकीस आली. यानंतर त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
1986 मध्ये, त्यांनी अर्जेटिनाला फुटबॉल विश्वचषक जिंकून दिला होता. सर्वोत्तम आक्रमक मिडफिल्डर, सेपंड स्ट्रायक पासिंग, बॉल पंट्रोलिंग अन् पासिंगचे बादशह अर्जेंटिनाला एकाहाती वर्ल्ड कप जिंकून देणारे असे अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
Diego Maradona was a maestro of football, who enjoyed global popularity. Throughout his career, he gave us some of the best sporting moments on the football field. His untimely demise has saddened us all. May his soul rest in peace.
— Narendra Modi (@narendramodi) November 26, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिएगो मॅराडोनाच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. “दिएगो मॅराडोना हा फुटबॉलमधील गुरु होता. त्याने जागतिक लोकप्रियता अनुभवली. त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याने आपल्याला फुटबॉल क्षेत्रातले काही अविस्मरणीय क्षण अनुभवण्यास दिले. त्याचं अकाली निधन हे आपणा सर्वांसाठी दु:खदायक आहे. त्याच्या आत्म्याला शांती लाभो ”, असे पंतप्रधानांनी त्यांच्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- … तर भाजपा मराठा आंदोलनाचं नेतृत्व करण्यास तयार आहे
- काँग्रेसच्या ‘या’ माजी मंत्र्याला तीन दिवसांची सीबीआय कोठडी
- वेळ पडल्यास ओबीसींच्या मागण्यासाठी राज्यभर महामोर्चे काढू : वडेट्टीवार
- ‘ते’ पुस्तक पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूचं आहे : नवाब मलिक
- लक्ष्मी विलास बँकेचं डीबीएस बँकेत विलीनीकरण करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
