🕒 1 min read
कोल्हापूर: रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) आक्रमक झाले आहेत. एफआरपी दोन टप्प्यात देण्यात येणार असल्यानं शेतकरी उपाशी आणि कारखानदार तुपाशी, अशी स्थिती निर्माण होणार असून त्या विरोधात सदाभाऊ खोत यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी याच मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
सदाभाऊ खोत म्हणाले, एफआरपीचा कायदा राज्य सरकारने पायदळी तुडवला. सरकारच्या या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना टनाला ७०० रुपयांचा फटका बसणार आहे. तसेच १ मार्चला राज्यभरात राज्यसरकारच्या आदेशाची होली करण्यात येणार असल्याचं देखील खोत यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
‘झेडपीच्या बांधकाम सभापतींनी मागितली दलाली’; खासदार इम्तियाज जलीलांचा आरोप
-
‘मलिकांच्या अटकेचं महाविकास आघाडीकडून राजकारण’ – रावसाहेब दानवे
-
“माझ्यावरही अन्याय झाला होता”; साहा वादानंतर सईद किरमानी यांचा धक्कादायक खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
