🕒 1 min read
मुंबई: रिद्धिमान साहा सध्या सर्व कारणांमुळे चर्चेचा विषय बनला आहे. कसोटी संघातून त्याला बाहेर काढणे असो किंवा पत्रकाराकडून मिळालेले धमकीचे संदेश असोत. मात्र साहासाठी टीम इंडियाचा दिग्गज कीपर जे भारताने पहिला विश्वचषक जिंकलेल्या संघाचे यष्टीरक्षक होते त्या सईद किरमानी यांनी समर्थन दर्शवले आहे. सोबतच त्यांनी साहाच्या परिस्थितीची त्याच्या स्वतःशी तुलना केली आहे. जेव्हा त्यांना भारतीय संघातून वगळण्यात आले होते.
सईद किरमानी यांनी नुकत्याच एका मुलाखतीत त्यांच्यासोबत झालेल्या अन्यायाबाबत सांगीतले “प्रत्येक क्रिकेटपटूला चढ-उतारातून जावे लागते. निवड समिती आणि संघ व्यवस्थापन खेळाडूबद्दल काय विचार करतात हे आम्हाला माहित नाही. माझ्यावरही अन्याय झाला आहे, पण त्यावर कोणी बोलत नाही. त्यावेळी मी माझ्या करिअरच्या शिखरावर होतो. तरीही, माझी कोणतीही चूक नसताना मला कसोटी आणि एकदिवसीय संघातून वगळण्यात आले. माझ्या आजूबाजूला स्पर्धा नव्हती. मी ८८ कसोटी खेळलो आणि अनेक प्रसंगी भारताच्या एकदिवसीय संघाचा तारणहार झालो. मी खराब कामगिरी करत असल्याचे वृत्तपत्रांमध्ये चुकीचे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. इतर कोणीतरी स्लिप कॉर्डनमध्ये झेल सोडत असतांना, माध्यमांनी माझे छायाचित्र प्रकाशित केले आणि किरमानीने झेल सोडला किंवा स्टंपिंग चुकवले असे सांगितले.”
किरमानी यांनी त्यांचे राज्य संघ कर्नाटकचे उदाहरण देखील दिले, ज्याने त्यांना पुनरागमन करण्याची संधी दिली नाही, आणि त्यांना रेल्वे संघात खेळावे लागले. “मी नेहमीच फायटर राहिलो आहे. जेव्हा मला पुनरागमन करून देशाचा सन्मान करायचा होता तेव्हा माझ्याच राज्याने [कर्नाटक] मला संघातून काढून टाकले. त्यामुळेच मला रेल्वे संघात जावे लागले. कर्नाटकचे राज्य क्रिकेट असोसिएशनचे तत्कालीन सचिव म्हणाले ” ‘अरे, तू रेल्वेला जात आहेस? तिथे तू कशी कामगिरी करतो ते पाहू.’ विश्वचषक विजेत्या आणि नेहमीच टीम मॅन असलेल्या व्यक्तीशी तुम्ही असेच बोलता का?”
महत्वाच्या बातम्या
- ‘उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार’; आदित्य ठाकरेंचे वक्तव्य
- कामरान गुलामला कानाखाली मारल्या प्रकरणी हरिस रौफला फटकारले
- “त्याक्षणी माझ्या हृदयाचा ठोका चुकला होता”; ईशान किशनने केला गौप्यस्फोट
- नवाब मलिकांनंतर कुणाचा नंबर?; सोमय्या म्हणतात चिट्ठी टाकावी लागेल
- कॅसिनोने विना परवानगी फोटो वापरल्याने सचिन तेंडुलकर केस करणार ; ट्विट करत दिली माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
