🕒 1 min read
गोरखपूर: उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेने (Shivsena) आपले उमेदवार उतरवले आहेत. शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी गोरखपूरमध्ये (Gorakhpur) सभा घेतली. या वेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) देखील उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, उत्तर प्रदेशमध्ये द्वेषाचे राजकारण नको.
महाराष्ट्रात मागील सरकारच्या कार्यकाळात काही चुकीच्या गोष्टी घडल्या. त्या सरकारमध्ये भाजपसोबत असल्याचे दु:ख वाटत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशमधील भाजप सरकारवरही टीका केली. सध्याचे मुख्यमंत्री हे निवडणुकीनंतर माजी मुख्यमंत्री होतील, असा टोलाही त्यांनी लगावला.
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, उत्तर प्रदेशात परिवर्तन करण्याची हाक यावेळी आदित्य यांनी दिली. उत्तर प्रदेशात रोजगार, महिलांना सुरक्षिता मिळायला हवी असेही त्यांनी म्हटले. उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार असून सध्याचे आजी मुख्यमंत्री काही दिवसांनी माजी मुख्यमंत्री होणार असल्याचे त्यांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या:
-
“त्याक्षणी माझ्या हृदयाचा ठोका चुकला होता”; ईशान किशनने केला गौप्यस्फोट
-
नवाब मलिकांनंतर कुणाचा नंबर?; सोमय्या म्हणतात चिट्ठी टाकावी लागेल
-
कॅसिनोने विना परवानगी फोटो वापरल्याने सचिन तेंडुलकर केस करणार ; ट्विट करत दिली माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
