Share

हे सरकार म्हणजे कोरोनाच्या महालात झोपलेलं भुताटकीचं सरकार – सदाभाऊ खोत

Published On: 

सांगली : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला असून रेकॉर्डब्रेक रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, गर्दी होऊ नये व त्यातून रुग्णसंख्या वाढू नये या साठी कडक निर्बंध लागू करण्यात आले असून प्रार्थनास्थळे देखील बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, आता रुग्णांचा आलेख हा काहीसा उतरता असून येत्या काही दिवसांमध्ये लॉकडाऊन टप्प्याटप्याने हटवण्यात येईल असे संकेत सरकारकडून दिले जात आहेत.

अशातच कोरोनाची एकूण परिस्थिती हाताळण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश आल्याची टीका करत आघाडी सरकारच्या कारभारावर माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विखारी शब्दात टीका केली आहे.

राज्यातील आघाडी सरकारच्या कारभारावर रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे. राज्यातलं आघाडीचं सरकार कोरोनाच्या महालात झोपलेलं भुताटकी सरकार आहे, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

हे सरकार म्हणजे कोरोनाच्या महालात झोपलेलं भुताटकीचं सरकार आहे. सरकार विरोधात कोणी आंदोलन करणार असेल तर त्याला कोरोनाची भीती दाखवण्याचं काम या भुताटकी सरकारकडून करण्यात येते, अशी टीका खोत यांनी केली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!