Share

व्यापाऱ्यांच्या माथी पुन्हा एकदा आरटीपीसीआर चाचणीचा फार्स, मनपाचे नियोजन शून्य!

Published On: 

औरंगाबाद : आजपासून औरंगाबाद शहर संपूर्णतः अनलॉक होत आहे. मात्र शहरातील बाजारपेठांमध्ये असणाऱ्या सर्वच व्यापाऱ्यांना प्रशासनाने आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केले आहे. मात्र यासाठी मनपा प्रशासनाने कुठलेही वेगळे नियोजन केलेले नाही. महानगरपालिकेची आधीपासूनच जी केंद्रे आहेत त्याठिकाणीच व्यापारी जाऊन तपासणी करु शकतात असे मनपातील सूत्रांनी सांगितले. यासंदर्भात कुठलेही आदेश आले नसल्याचे सांगण्यात आले. मात्र कोरोना चाचणी करण्यापेक्षा लसीकरण करावे. आणि व्यापारी वर्गाला आरटीपीसीआर करण्यातून मुक्त करावे अशी मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

आजपासून सर्व दुकाने खुली करण्यात आली आहेत. मात्र व्यापारी वर्गाला पाच ते सात दिवसांत आरटीपीसीआर करणे बंधनकारक केले आहे. परंतु आता कोरोना लसीकरण झाले आहे मग पुन्हा आरटीपीसीआर कशासाठी? असा प्रश्न व्यापारी वर्गाकडून उपस्थित केला जात असून आरटीपीसीआर करण्यापेक्षा लसीकरण करण्यात यावे अशी मागणी व्यापारी वर्गाकडून केली जात आहे.

मार्केट आजपासून सुरू झाल्याने व्यापाऱ्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहेत. दुकाने सुरू करण्यासाठी धडपड सुरू असताना त्यात आरटीपीसीआरची अट घालून दिली आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाला आता पुन्हा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. अगोदर व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणात कोरोना तपासण्या केल्या होत्या. इतकेच नव्हे तर लसीकरण देखील केले आहे. लस घेतली असताना आता कोरोनाची चाचणी कशासाठी करायची? असा प्रश्न व्यापाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!