Share

‘मोदी सरकार म्हणजे जनतेची लुटमार करणारे सरकार’ 

Published On: 

पुणे : केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किंमती भरमसाट वाढविल्या आहेत. त्याच्या निषेधार्थ कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरातील ३६ ठिकाणी निदर्शने करण्यात आली.

यावेळी बी. टी. कवडे रोड येथील भारत पेट्रोलियम पंप येथे बोलताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसची दरवाढ करून सर्व सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. केंद्रात युपीए चे सरकार असताना आतंरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती भरमसाट वाढलेल्या असतानाही देशांतर्गत पेट्रोल, डिझेलच्या किंमतीवर युपीए सरकारने परिणाम होऊ दिला नाही. परंतु मोदी सरकारने भाववाढ करून सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी काहीही प्रयत्न केलेला दिसत नाही. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे, त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहे.

मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलमधून कराच्या रूपाने लाखो कोटी रूपये नफा मिळविला आहे. गेल्या मे २०२० पासून गॅसवरची सबसीडी बंद केली आहे. आज गॅसची किंमत ही ९०० रू. झाली आहे त्यामुळे गृहिणींना घर चालविणे अवघड झाले आहे. जेव्हा पेट्रोल, डिझेलचे दर वाढतात त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंवरही होतो आणि त्यांचेही भाव वाढतात. सामान्य जनतेची पिळवणूक करणाऱ्या मोदी सरकारला जागे करण्यासाठी आज काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून निदर्शने करीत आहे. हे सरकार म्हणजे जनतेची लुटमार करणारे सरकार आहे. मोदी सरकारने त्वरीत पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर कमी केले पाहिजे अन्यथा जनतेच्या हितासाठी पुढच्या काळात काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करणार. अस देखील बागवे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!