Share

वाहन चोरट्यांचा धुमाकुळ, शहरातून पुन्हा पाच दुचाकी लंपास

Published On: 

औरंंगाबाद : शहर परिसरात धुमाकुळ घालत वाहन चोरट्यांनी शहराच्या विविध भागातून पाच दुचाकी लंपास केल्या आहेत. वाढत्या वाहन चोऱ्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून वाहनचोरट्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी वाहनधारकातून करण्यात येत आहे.

अक्षय प्रेमचंद कासलीवाल (वय ३०, रा.बालाजीनगर) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-ईसी-००७९) चोरट्याने ४ जून रोजी निरालाबाजार परिसरातील तापडीया सुपर मार्वेâट येथून चोरून नेली. योगेश रघुनाथ चौधरी (वय ३८, रा.सिडको एन-८) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-एई-१५१३) चोरट्याने ३१ मे रोजी घराजवळून चोरून नेली. भाग्यश्री प्रकाश अष्टेकर (वय २५, रा.भाग्योदयनगर, सातारा) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-एफके-३९६५) चोरट्याने २५ मे रोजी घराजवळून चोरून नेली.

विक्रम पृथ्वीराजसिंह ठाकूर (वय ३७,रा.न्यु.शांतीनिकेतन कॉलनी) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-३१-सीजे-६६६२) चोरट्याने १ जून रोजी घराजवळून चोरून नेली. नवनाथ आसाराम वाघ (वय ४६, रा.श्रध्दा कॉलनी, वाळुज) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-सीई-२६०५) चोरट्याने ४ जून रोजी घराजवळून चोरून नेली.
शहराच्या विविध भागातून दुचाकी वाहने लंपास करणा-या चोरट्याविरूध्द अनुक्रमे क्रांतीचौक, सिडको, सातारा,जवाहरनगर आणि वाळूज पोलिस ठाण्यात प्रत्येकी १ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!