पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. दरम्यान, पुणे शहरात एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सात हजार रुग्णांची वाढ होत होती. यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यासाठी देखील ही बाब गंभीर होती. मात्र, आता कोरोना रुग्णांच्या आकड्यात मोठी घट होत असून कोरोना बाधितांची संख्या देखील अधिक आहे.
तर, राज्य सरकारच्या नव्या निर्देशांनुसार पुण्यात काही निर्बंधांसह अनलॉकला आज (दि. ७ जून)पासून सुरुवात झाली आहे. यामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असून सर्वच ठिकाणी वर्दळ वाढली आहे. अशातच, पुणेकरांसाठी आज आणखी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील नीचांकी रुग्णसंख्या आज नोंदवण्यात आली आहे.
पुणे शहरात आज नव्याने १७७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, शहरातील ५१४ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात आज नव्या कोरोना बाधितांमध्ये घट होण्यासह मृत्युसंख्येत देखील घट झाली आहे. आज कोरोनाने १५ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, पुणे शहरात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजारांच्या आत आली आहे. सध्या पुण्यात ३ हजार ९४३ सक्रिय रुग्ण असून ६२५ रुग्ण गंभीर तर १,२४९ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘…त्याआधीच मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या भेटीला निघालेत ही गोष्ट आकलनापलीकडची’
- …म्हणून मोदींनी लसीकरणाच्या जबाबदारीची घोषणा केली; नवाब मलिकांचा दावा
- कापसाची लागवड १५ जूननंतरच करा! कृषी विभागाचे आवाहन
- आता लहान मुलांनाही कोरोना लस मिळणार ; मोदींनी सांगितला ‘हा’ प्लान
- ‘मोदी सरकार म्हणजे जनतेची लुटमार करणारे सरकार’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
