मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना संबोधित केले. २१ जूनपासून १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस मोफत देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यावेळी त्यांनी लसीकरणाची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकार घेत असल्याचे सांगितले आहे.
१ मेपासून 18 वर्षांवरील लोकांना लस देण्याचे काम राज्यांवर २५ टक्के सोपवले होते. त्यांनी आपल्या परीने काम केले. पण, हे काम करत असताना किती अडचणी येतात हे लक्षात आहे. संपूर्ण देशात काय परिस्थिती आहे. ते यांच्या लक्षात आहे. एकीकडे कोरोनाची दुसरी लाट आणि लोकांकडून लशी मागणी वाढली. त्यामुळे राज्य सरकारांना कळून चुकले की पहिली व्यवस्था ही चांगली होती. एक चांगली गोष्ट राहिली, राज्य सरकार हे फेरविचार करून आमच्याकडे आले आणि देशातील नागरिकांना त्रास होऊ नये.
त्यामुळे राज्य सरकारच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्राकडे घेण्यात आली आहे. देशातील सर्व लोकांना मोफत लस मिळणार आहे, अशी घोषणा मोदींनी केली. यापूर्वी, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्य सरकारांवर सोपवण्यात आली होती.
पंतप्रधानांच्या या निर्णयानंतर भाजपच्या नेत्यांनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे. महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून सर्वांसाठी मोफत लसीकरणाच्या या निर्णयाचे स्वागत केले. तसेच या निर्णयामुळे देशातील लसीकरण मोहिमेस गती प्राप्त होईल असं देखील ते म्हणाले.
केंद्र सरकारच्या या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले कि, ‘राज्य सरकारांनी केलेल्या आग्रहामुळेच केंद्र सरकारतर्फे राज्यांना २५ टक्के लसी खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र नंतर राज्य सरकारांनी स्वतःच लसींबाबतची जुनी प्रणाली कार्यान्वित करावी अशी मागणी केली. यामुळेच केंद्र सरकारने पुन्हा संपूर्ण लसीकरणाची जबाबदारी आपल्याकडे घेतली आहे.’ अशी भूमिका मांडली आहे.
‘या निर्णयामुळे लसीकरण मोहिमेचा वेग वाढण्यास मदत होईल. यापुढे लसीकरणाचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार असल्याने राज्यांना व नागरिकांना मिळणाऱ्या लसी या केंद्रातर्फे मोफत उपलब्ध करून देण्यात आलेल्या असतील. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार.’ असंही फडणवीस म्हणाले. तसेच त्यांनी यावेळी पंतप्रधानांनी, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला दिवाळीपर्यंत मुदतवाढ दिल्याबाबतही फडणवीस यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबादेतील मटका अड्डे उद्ध्वस्त, पोलिसांची धाडसी कारवाई
- …म्हणून मोदींनी लसीकरणाच्या जबाबदारीची घोषणा केली; नवाब मलिकांचा दावा
- कापसाची लागवड १५ जूननंतरच करा! कृषी विभागाचे आवाहन
- आता लहान मुलांनाही कोरोना लस मिळणार ; मोदींनी सांगितला ‘हा’ प्लान
- रेल्वेकडे प्रवाशांची पाठ; अनलॉकमध्येही आजपासून ‘या’ रेल्वे रद्द!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

