Share

IPL 2022 : बापरे! विराट कोहलीनं शुबमन गिलकडं पाहत केला अंडरटेकर स्टाईलने खतरनाक इशारा; पाहा VIDEO!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगामातील 67 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळायला गेला होता. या सामन्यात बंगळुरूने गुजरातचा ८ गडी राखून एकतर्फी पराभव केला. त्यामुळे बंगळुरूचे यंदाच्या स्पर्धेतील प्लेऑफचे आव्हान कायम राहिले आहे. या सामन्यात विराट कोहली बंगळुरूच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने सामन्यांमध्ये दमदार अर्धशतक झळकावत बंगळुरूला विजय मिळवून दिला. विराट या सामन्यात चांगलाच लयमध्ये दिसत होता. त्याच्या फलंदाजीबरोबरच क्षेत्ररक्षणातही आक्रमकपणा दिसला.

गुजरात विरुद्धच्या सामन्यात विराटने क्षेत्ररक्षणादरम्यान डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) स्टार अंडरटेकर च्या प्रसिद्ध थ्रोट स्लॅशची नक्कल केली. अंडरटेकर च्या गळा कापण्याचे इशाऱ्याला ‘थ्रोट स्लॅश’ असे म्हटले जाते. विराटने गुजरातचा फलंदाज शुबमन गिलकडे पाहत हा इशारा केला. विराटच्या अशा इशाऱ्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

https://twitter.com/Biscuit8Chai/status/1527563466491711490?s=20&t=16AtOlnURZOqofQIVUY7jw

यंदाच्या आयपीएल हंगामात विराटला चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र गुजरात विरुद्ध विराट आत्मविश्वासाने खेळताना दिसला. त्याने ५४ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७३ धावा केल्या. सामन्यात गुजरात टायटन्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना बंगळुरूसमोर १६९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. विराटच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर बंगळुरूने लक्ष्य ८ गडी राखून सहज पार केले.

महत्वाच्या बातम्या:

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!