Share

करावं तस भरावं,पवारांनी अनेकांचे पक्ष फोडले आज राष्ट्रवादी त्यांच्याच डोळ्यादेखत फुटतीये – सदाभाऊ

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्य पार्श्वभूमीवर अनेक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसला खिंडार पडले आहे. यावरून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला आहे. शरद पवार यांनी जे पेरले तेच उगवले. पवारांनी अनेकांचे पक्ष फोडले. त्यामुळे आता राष्ट्रवादी पक्ष त्यांच्याच डोळ्यादेखत फुटतोय, असा टोला लगावला आहे.

याबाबत सदाभाऊ खोत म्हणाले की, पवार आता स्वतःच्या कर्माचे चित्र बघत आहेत. शरद पवारांनी आतापर्यंत अनेकांचे पक्ष फोडले आहेत. मात्र आज त्यांचा राष्ट्रवादी पक्ष त्यांच्याच डोळ्यादेखत फुटत आहे. करावं तसं भरावं ही म्हण आपल्याकडे चांगली प्रचलित आहे. त्यामुळे जे पवार साहेबांनी पेरलं तेच उगवत आहे.

दरम्यान सदाभाऊ खोत यांनी याबाबत बोलताना शरद पवार आणि वसंतदादा पाटील यांच्यातल्या वादाची आठवण करून दिली. खोत म्हणाले की, शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला असे आतापर्यंत बोलले जाते. त्यावेळी वसंतदादा पाटील यांना किती दुःख झाले असेल? त्यामुळे आता शरद पवार यांच्या पक्षात जे घडतेय ते फार वेगळे घडतेय असे नाही.

महत्वाच्या बातम्या 

पुण्याची आस्था आणि जाण असणारा खासदार हवा; वंदना चव्हाण यांचा काकडेंना टोला

तारीख, वार आणि मैदान ठरवा. मी दोन हात करायाला तयार, खोतांचे शेट्टींना ओपन चॅलेंज

शिवेंद्रसिंहराजेंना थोपवण्यासाठी शरद पवारांनी आखलाय हा ‘बिग गेम’

भाजप-सेनेकडून सत्तेचा गैरवापर; शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!