टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या पक्षांतराचे वारे वाहत आहे. आघाडीतील बरेच नेते शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. या पक्षांतरानावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजप -सेनेवर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना ‘माझ्या दृष्टीने सध्या काही विशेष घडत नाही. पक्षांतराचं म्हणायचं तर मला याची थोडीही चिंता वाटत नाही. सध्या भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे. मात्र याला उत्तर कसं द्यायचं हे आम्हाला ठाऊक आहे पक्षांतर केलेल्या लोकांना केंद्र आणि राज्यात सत्तेशिवाय आपल्याला निवडून येणं शक्य नाही, अशी भीती मनात होती. असा वर्ग अस्वस्थ आणि अस्थिर झाला आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे, ते सत्तेचा वापर करून अनेकांना ओढून घेत आहेत, अशी टीका शरद पवार यांनी केली.
दरम्यान, राष्ट्रवादीचे मुंबई जिल्हाध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर जाणार आमदार वैभव पिचड हे देकील भाजपात प्रवेश करणार आहे. तर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही आपल्या पदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला आहे. चित्रा वाघ या भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

