टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बुधवारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. शिवेंद्रसिंहराजेंचा भाजप प्रवेश उदयनराजेंच्या पथ्यावर पडणार आहे. परंतु,राष्ट्रवादी साताऱ्याची जागा नक्की राखणार, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. ते साताऱ्यात बोलत होते.

साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या भाजप प्रवेशानंतर सायंकाळी सहाच्या दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार वाटेगावला जाताना साताऱ्यात थांबले. येथील शासकीय विश्रामगृहात त्यांची राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी भेट घेऊन सुमारे तासभर कमराबंद चर्चा केली. यावेळी आमदार जिंतेंद्र आव्हाड उपस्थित होते.
श्रीमंत राणीसाहीबा कल्पनाराजे (सातारा)
ह्यांची आज साताऱ्यात भेट झाली त्या श्रीमंत छत्रपती उदयनराजे ह्यांच्या मातोश्री आहेत pic.twitter.com/5GHRYw0vFt— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 1, 2019
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे कार्यक्रमासाठी खासदार शरद पवार निघाले होते. जाताना सायंकाळी सहाच्या सुमारास साताऱ्यात थांबले. थोडावेळ थांबल्यानंतर श्पवार यांना भेटण्यासाठी उदयनराजे यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे भोसले येथे आल्या, पवार आणि राजमाता कल्पनाराजे यांच्यात सुमारे तासभर कमराबंद चर्चा झाली. यावेळी जिंतेंद्र आव्हाड उपस्थित होते.
आगामी काळात खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीची वाटचाल होण्याच्या दृष्टीने चर्चा झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र दुसरीकडे शिवेन्द्रराजेंना थोपवण्यासाठी शरद पवार खेळी खेळून कल्पनाराजे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचे चिन्ह दिसत आहेत. अस झाल्यास साताऱ्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळेल यात तिळमात्र शंका नाही.
महत्वाच्या बातम्या
राष्ट्रवादी, शरद पवार यांच्याशी आपण एकनिष्ठ, ‘या’ खासदाराने केला दावा
आज ‘या’ कारणामुळे पवार आणि फडणवीस एकाच मंचावर
न्यायालय मराठा आरक्षणाबाबत योग्य निर्णय देईल अशी खात्री – उदयनराजे भोसले
कॉंग्रेसमध्ये राष्ट्रवादीचं विलीनीकरण करा, ‘या’ बड्या नेत्याने केली मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

