Share

“म्हणजे मुल स्वतः जन्माला घालायची…”; सदाभाऊ खोतांची नवाब मलिकांवर बोचरी टीका

Published On: 

मुंबई : दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले काही महिने कोरोनाला ब्रेक लागला होता. परिस्थिती पूर्वपदावर येत होती. परंतु आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. असे असतांनाच आता देशभरात कोरोना आणि ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. दरम्यान, याला अनुसरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी कोरोनाची तिसरी लाट निर्माण करण्यात भाजपच्या लोकांचा हात राहील, अशी टीका केली आहे.

नवाब मलिकांच्या या टीकेवर आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यासंदर्भात सदाभाऊ खोत यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’कोरोनाची तिसरी लाट आल्यास त्याला भाजपच जबाबदार असेल असे नवाब मलिक म्हणतात. म्हणजे मुल स्वतः जन्माला घालायची, नाव मात्र शेजाऱ्याचे लावायचे’, असे म्हणत खोत यांनी मलिकांना खोचक टोला लगावला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढत आहे. प्रधानमंत्री लोकांना सोशल डिस्टन्सिंग ठेवायला, मास्क लावायला सांगत आहेत, पण तरीही भाजपचे लोक त्यांचे ऐकत नाही. उत्तर प्रदेशमध्ये गृहमंत्री, योगी हजारोंच्या संख्येने लोक जमवित आहेत. त्यांच्या प्रचारसभा थांबत नाहीत. इतर राज्यांत निवडणुकी दरम्यान दुसरी लाट आली, त्याचप्रमाणे तिसरी लाट निर्माण करण्यात भाजपच्या लोकांचा हात राहील, हे स्पष्ट आहे, असे नवाब मलिक म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!