🕒 1 min read
मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी आढळून आली होती. या प्रकरणाचं गूढ अधिक वाढत असून त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे हे संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. याप्रकरणी सचिन वाझे यांना एनआयए ने अटक केली आहे.
दरम्यान, सचिन वाझे यांना एनआयएच्या विशेष न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता सचिन वाझे यांची कसून चौकशी करण्याचा राष्ट्रीय तपासयंत्रणेचा (NIA) मार्ग मोकळा झाला आहे. तर, काल ठाणे सत्र न्यायालयाने देखील सचिन वाझे यांचा अंतरिम जामीन नाकारला होता. सचिन वाझे यांच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचं सांगत न्यायालयाने हा अंतरिम जामीन नाकारला होता.
सचिन वाझे यांच्यावर कोणकोणत्या गंभीर गुन्ह्यांची कलमं लावण्यात आली आहेत, याची आपण माहिती घेऊयात –
कलम २८६ – जाणीवपूर्वक अथवा अजाणतेपणी स्फोटकं बाळगणे,
कलम ४६५ – कोठ्या किंवा बनावट गोष्टी करणे, कलम ४७३ – दिशाभूल करण्यासाठी बनावट कृती करणे,
कलम ५०६ – दहशत निर्माण करणं; धमकी देणं,
कलम १२० ब – गुन्हेगारी कट रचणे,
यासोबतच स्फोटक पदार्थ कायदा १९०८ कलम ४ अ, ब – स्फोटके बाळगणे या गंभीर कलमांतर्गत सचिन वाझेंवर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : सचिन वाझेंच्या अडचणी वाढल्या, २५ मार्चपर्यंत NIA कोठडी मान्य
- ‘या प्रकरणातील सत्य शोधून काढा आणि…’ ; झोमॅटो मारहाण प्रकरणात परिणीती चोप्राची उडी
- …म्हणून अजित पवारांनी फडणवीसांसोबत एकाच मंचावर येणं टाळलं
- ‘महाविकास आघाडीला १७१ आमदारांचा पाठींबा आहे, आम्ही निवडणुकीला घाबरत नाही’
- ईशान किशन जे बोलला ते ऐकून विराट त्याला संघात जागा देण्याचा नक्कीच विचार करेल !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
