मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. वाझे यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर सचिन वाझेंकडून या प्रकरणात ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.
दरम्यान, ठाणे सत्र न्यायालयाने सचिन वाझे यांचा अंतरिम जामीन नाकारला यामुळे सचिन वाझे यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. याप्रकरणी सचिन वाझे यांना आता अटक करण्यात आली आहे. काल रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी वाझे यांना अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे.
एनआयएच्या विशेष न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता सचिन वाझे यांची कसून चौकशी करण्याचा राष्ट्रीय तपासयंत्रणेचा (NIA) मार्ग मोकळा झाला आहे. ‘एनआय’च्या वकिलांनी सचिन वाझे यांची १० दिवसांची कोठडी द्यावी, अशी मागणी केली होती. यापूर्वी शनिवारी NIA ने सचिन वाझे यांनी तब्बल १३ तास चौकशी केली होती. या चौकशीनंतर ‘एनआयए’ने सचिन वाझे यांना अटक केली होती.
त्यामुळे आता पुढच्या काही दिवसांत एनआयए सचिन वाझे यांच्याकडून कोणती माहिती बाहेर काढणार, हे पाहावे लागेल. आतापर्यंतच्या चौकशीत सचिन वाझे यांनी एनआयएला बरीच खळबळजनक माहिती दिली होती. त्यामुळे आता आगामी काळात याप्रकरणातील आणखी कोणत्या गोष्टी बाहेर येणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
महत्वाच्या बातम्या
- सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करायची असेल तर करा – नाना पटोले
- ‘या प्रकरणातील सत्य शोधून काढा आणि…’ ; झोमॅटो मारहाण प्रकरणात परिणीती चोप्राची उडी
- …म्हणून अजित पवारांनी फडणवीसांसोबत एकाच मंचावर येणं टाळलं
- ‘महाविकास आघाडीला १७१ आमदारांचा पाठींबा आहे, आम्ही निवडणुकीला घाबरत नाही’
- ईशान किशन जे बोलला ते ऐकून विराट त्याला संघात जागा देण्याचा नक्कीच विचार करेल !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

