🕒 1 min read
मुंबई : दिग्गज भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) नेटिझन्समध्ये खूप लोकप्रिय आहे. मॉडेलिंगमुळे ती चर्चेत आली होती. आता तिच्या बॉलिवूड पदार्पणाची (Sara Tendulkar Bollywood debut) बातमी येत आहे. सारा फक्त २४ वर्षांची आहे आणि बहुतेक स्टार किड्सप्रमाणे ती सोशल मीडियावर सक्रिय आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, साराने तिचे शालेय शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून केले आहे. त्यांनी युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमधून पदवी प्राप्त केली आहे. साराची आई डॉक्टर आहे. मात्र, साराने स्वत:साठी वेगळा मार्ग निवडल्याचे दिसते. ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याच्या चर्चा आहेत.
https://www.instagram.com/p/CcmrsmnABJP/
”सारा तेंडुलकर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते. तिला अभिनयात खूप रस आहे. तिने अभिनयाचे काही धडेही घेतले आहेत. साराने काही ब्रँड्सनाही एन्डॉर्स केले आहे. सारा स्वतःला लो प्रोफाईल ठेवते, परंतु ती तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना आश्चर्यचकित करू शकते. ती अत्यंत प्रतिभावान आहेत. साराने कोणताही निर्णय घेतला तरी तिला तिच्या पालकांचा खूप पाठिंबा असतो”, असे बॉलिवूड लाइफच्या एका सुत्राने सांगितले होते.
https://www.instagram.com/p/CaCimDGNTHZ/
साराचे सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत. तिला सध्या इन्स्टाग्रामवर १.९ मिलियन लोक फॉलो करतात. साराचा भाऊ अर्जुन हा क्रिकेटपटू असून तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघात आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने मुंबईचे प्रतिनिधित्व केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
