शिवसैनिकांनी भाजपनेते किरीट सोमय्या यांच्यावर केलेल्या हल्ल्यामध्ये त्यांना हनुवटीवर किरकोळ जखम झाल्याचं पाहायला मिळालं. त्या जखमेवरूनही आता अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. काही नेते मंडळींचं म्हणणं आहे कि हि जखम सोमय्या यांनी स्वतः हून करून घेतली आहे. अशीच टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही केली आहे. सोमय्या हे ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून राष्ट्रपती राजवटीची मागणी करत आहेत, त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे असं राऊत यावेळी म्हणाले.
त्याचबरोबर आज पुन्हा त्यांनी उत्तर प्रदेशमधील घटनांचा आणि जिग्नेश मेवाणी यांच्या अटकेचा देखील उल्लेख केला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

