🕒 1 min read
मुंबई: आयपीएलच्या १३व्या सामन्यात युजवेंद्र चहलचा सामना बलाढ्य फलंदाज विराट कोहलीशी होणार आहे. गेल्या मोसमापर्यंत हे दोन्ही खेळाडू आरसीबीसाठी एकत्र खेळत होते. युझवेंद्र चहल हा विराट कोहलीचा सर्वात आवडता गोलंदाज मानला जातो. चहलने २०११ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. मात्र यंदा ८ वर्षांनी आजच्या सामन्यात एक विशेष घटना होणार आहे.
चहलने २०१२ मध्ये RCBमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून, आयपीएल २०२१ पर्यंत संघासोबत खेळला. आयपीएल २०२२ मध्ये चहलला राजस्थान (RR) संघाने ६ कोटी ५० लाख रुपये देऊन त्याच्या संघात सामील केले होते. आज होणाऱ्या सामन्यात विराट कोहली आणि युझवेंद्र चहल आठ वर्षांनंतर एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत. अशा स्थितीत युझवेंद्र चहलकडे (Yuzvendra chahal) विराट कोहलीची (Virat kohli) विकेट काढून त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवण्याची सुवर्णसंधी असेल.
आता युझवेंद्र चहल आयपीएल 2022 मध्ये विराट कोहलीची विकेट घेऊ शकतो की नाही हे पाहणे बाकी आहे. चहलने विराटची विकेट घेतल्यास आयपीएलमध्ये विराट कोहलीला बाद करण्याची ही पहिलीच वेळ असेल. खरंच, हे दृश्य खूप मनोरंजक ठरेल. मागच्या हंगामात चांगली कामगिरी करूनही आरसीबीने रिटेन न केल्याने चहल नाराज होता. ज्यामुळे तो आजच्या सामन्यात बदला घेण्यासाठी खेळताना दिसू शकतो.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 RCB vs RR: मॅक्सवेल संबधी मोठी अपडेट! आज राजस्थान विरुद्ध मैदानावर उतरणार?
- अजित पवारांना ‘मुतऱ्या तोंडाचे’ म्हणत शिवसेनेनं केली होती जहरी टीका! आता मात्र बदललीय भूमिका
- “श्रीलंकेसारखी परिस्थिती भारतात ही होऊ शकते..” केआरकेचा मोदी सरकारवर निशाणा
- IPL 2022: SRH विरुद्ध फिफ्टी करताच के एल राहुलने बनवला रेकॉर्ड; सेहवागला मागे सोडले!
- “हे त्यांचे विधान म्हणजे मानसिक तयारी होती”, भातखळकरांचा राऊतांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
